पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) : अक्कलकोटच्या श्री अमोल पाटील व बार्शीच्या योगेशजी उपळकर सर यांच्यासह 32 जणांना ज्योतिबा-सावित्री गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रहार माध्यमिक शिक्षक संघटना यांच्यामार्फत प्रदान करण्यात आला.
सोहळ्याला प्रमुख पाहुणे माननीय नवनिर्वाचित आमदार सचिन पंचप्पा कल्याण शेट्टी तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक जगताप साहेब शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख विशेष निमंत्रित प्रमुख पाहुणे सचिन चिवटे साहेब(कक्षा अधिकारी उपमुख्यमंत्री सहाय्यता निधी आरोग्य विभाग) यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला.
संघटनेचे अध्यक्ष श्री सचिन जी नागटिळक सर सचिव दराडे सर अक्कलकोट तालुकाप्रमुख बुद्रुक सर जिल्हा संघटक श्री गोसावी सर यांनी या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले पुरस्कार विजेते श्री अरविंद शिंदे सर शहाजी स्कूल अक्कलकोट यांनी संघटनेबाबत तसेच नागटिळक सरांच्या विशेष योगदानाबद्दल माहिती सांगून शिक्षक संघटना किती प्रबळ असली पाहिजे व त्याचा समाज जीवनावर काय परिणाम होतो याबाबत त्यांनी माहिती दिली. उमेश कल्याणी सर यांनी सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थित नियोजन केले.
श्री मंगेश जी छोटे सर यांच्या माध्यमातून सन्माननीय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी व्हिडिओ कॉल द्वारे सर्वांशी सुसंवाद साधला व योग्य मार्गदर्शन केले. तसेच गांभीर्यपूर्वक जे जे पुरस्कार विजेते आहेत व पुरस्कार देणारे आहेत त्यांनी किती गांभीर्याने हे पुरस्कार घ्यावा याची कल्पना मनापासून दिले कारण पुरस्कार घेऊन फक्त निवड होत नसते तर तुमच्या कार्याची कार्यतत्परता वाढली जाते हे त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमासाठी श्री सचिन नागटिळक सर दराडे सर उमेश कल्याणी सर विजय बुद्रुक सर या सर्वांनी परिश्रम घेतले व शेवटी श्री शंकर आगलावे सर यांनी आभार प्रदर्शन केले.







