ठाणे (जिल्हा क्राइम रिपोर्टर जितेंद्र तारमळे) : दि. २१/१२/२०२४ रोजी १०३(१),१०९(१),३१२, ३(५) सह शस्त्र अधिनियम ३, २७ जबरी चोरी सह खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहापुर शहरामधील पंडींत नाका येथील महालक्ष्मी ज्वेलर्स दुकानातील कामगार याचेवर दि. २१/१२/२०२४ रोजी रात्री ०९.०० वा. चे सुमारास जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने दोन अज्ञात आरोपींने मोटारसायकल वरून येवुन फायरिंग करून सोनाराची बॅग घेवुन पळुन गेले होते त्या अनुषंगाने वरील प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आलेला होता.
सदरचा गुन्हा हा गंभीर असुन त्याचे गांभीर्य लक्षात घेवुन मा. पोलीस अधीक्षक डॉ. श्री. डी. एस.स्वामी, मा. अपर पोलीस अधिक्षक भरत तांगडे, यांनी घटनास्थळावर भेट देवुन गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने उप विभागीय पोलीस अधिकारी शहापुर श्री. मिलींद शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेशपुरी श्री. राहुल झाल्टे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, ठाणे ग्रामीण सुरेश मनोरे, पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकुर शहापुर पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, शहापुर पोलीस ठाणे, वाशिंद पोलीस ठाणे, पडघा पोलीस ठाणे, कसारा पोलीस ठाणे, भिवंडी तालुका पोलीस ठाणे, किनवली पोलीस ठाणे, सायबर विभाग अशी एकुण १२ पथके तयार करण्यात आली होती.
सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा व इतर पथकांनी केलेल्या सी. सी. टी. व्ही. तपासाच्या आधारे तसेच गुप्त बातमीदार व तांत्रीक तपासाच्या आधारे वरील आरोपीत हे काही दिवस भिवंडी येथे राहीले असल्याचे समजले तसेच सदरचे आरोपीत हे कौशिंबी उत्तर प्रदेश येथील असल्याचे समजल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उप निरीक्षक महेश कदम यांचे व शहापुर पोलीस ठाणे कडील एक पथक लागलीच उत्तर प्रदेश येथे रवाना करण्यात आले.
उत्तर प्रदेश येथे गेलेल्या पथकाने प्रयागराज येथील स्पेशल टास्क फोर्स च्या मदतीने वरील गुन्हयातील संशयीत आरोपीत सशांक उर्फ सोनु बलराम मिश्रा वय – ३२ रा. बंधवा राजवर, मंझनपुर जि. कौशिंबी उत्तर प्रदेश यास सापळा रचुन ताब्यात घेतले. त्याचे कडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने वरील गुन्हा त्याचा साथिदार व पाहीजे आरोपीत अंकीत उर्फ सिंटु यादव रा. कोकराज जि. कौशिंबी व फैजन पप्पु सिद्धकी जि. कौशिंबी यांचे मदतीने केला असल्याचे सांगीतल्याने सदर आरोपीत यास अटक करून उत्तर प्रदेश येथुन शहापुर पोलीस ठाणे येथे आणण्यात आले आहे. अटक आरोपीत यास मा.न्यायालयात हजर केले असता आरोपीत यांना दि.१३/०१/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे.
याप्रकरणातील सशांक उर्फ सोनु बलराम मिश्रा वय – ३२ रा. बंधवा राजवर, मंझनपुर जि. कौशिंबी उत्तर प्रदेश, तौसिफ आलम कबिरूद्दीन सिद्धकी वय-३५ रा. सिरोही ता.चायल जि. कौशिंबी अटक आरोपी क्रं. ०१ याचे वर खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक डॉ. श्री. डी. एस. स्वामी, मा.अपर पोलीस अधीक्षक भरत तांगडे यांचे मार्गदर्शनाखाली, उप विभागीय पोलीस अधिकारी शहापुर श्री. मिलींद शिंदे, उप विभागीय पोलीस अधिकारी गणेशपुरी श्री. राहुल झाल्टे, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, ठाणे ग्रामीण सुरेश मनोरे, पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकुर शहापुर पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बारवे वांशिंद पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक दादासो एडके भिवंडी तालुका पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक बाळा कुंभार पडघा पोलीस ठाणे यांचे नेतृत्वाखाली सहा. पोलीस निरीक्षक श्रिकांत शिंदे, दिपाली लंबाते, श्रीकांत जाधव, शिवकुमार जाधव, दानिश मन्सुरी, पोलीस उप निरीक्षक महेश कदम, अंकुश वारूंगसे, पंकज पाटील, आकाश साळुंखे, उमेश खिरड, शरद सुरळकर, सुरेश बाविस्कर, हिंमत सरगर तसेच सहा. फौजदार सुनिल कदम व पोलीस हवालदार/ प्रकाश साईल, संतोष सुर्वे, सतीश कोळी, गोविंद कोळी, हेमंत विभुते, हनुमान गायकर, शशीकांत पाटील, उमेश ठाकरे, भगवान सोनावणे, सुहास सोनावणे, शशी पाटील, अनिल भोसले, पाडुरंग ढोबळे, संतोष तांबोळी, दर्शन साळवे, काशिनाथ सोनावणे, पोलीस नाईक / जितेंद्र वारके, मंजुर शेख, जयवंत मोरे, रामा शिंदे, विकास सानप, अबेद अली सय्यद, पोशि/ स्वप्निल बोडके, जयेश मुकादम, रमेश नलावडे, मोहन भोईर, सरेश धिंदळे, कमलाकर शिरोसे, दशरथ देसले, योगेश वाघेरे, अर्जुन पारधी, कुणाल बावधणे, योगेश निर्मळ, राहुल दाभाडे, नरेश निमसे, दत्ता भोईर, इम्राण शेख, पडवळ, गिरासे, साळुंखे, तडवी, व सायबर विभागाचे पोहा / दिपक गायकवाड व रवि मोरे या पथकाने उल्लेखनिय कामगिरी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास उप विभागीय पोलीस अधिकारी शहापुर श्री. मिलींद शिंदे हे करीत आहेत.







