प्रवासी हितासाठी संघर्ष समितीतर्फे एस.टी.आगारप्रमुखांना निवेदन

एरंडोल निवेदन

एरंडोल (कायदेशीर सल्लागार ॲड. दिनकर पाटील) : सोमवार (दि.६) रोजी संघर्ष समिती पदाधिकारी यांनी एरंडोल एस. टी. आगार प्रमुख विजय पाटील यांना निवेदन देऊन ‌प्रवासी हितासाठी महत्वाचे प्रश्न मांडत संघर्ष समितीने या संदर्भात चर्चा केली.

 

याप्रसंगी संघर्ष समिती अध्यक्ष श्री.लाळगे नाना, उपाध्यक्ष नामदेव राव पाटील, ॲडव्होकेट दिनकरराव पाटील, स्वप्नील सावंत, नानाभाऊ मिस्तरी व कार्यकारिणी संचालक उपस्थित होते.

चर्चेत जळगाव-एरंडोल जनता बस सुरु करण्यात यावी, विनंती थांबा बचपन स्कूल व धरणगाव चौफुली ‌येथे देण्यात यावा, बस स्टन्ड परिसरात स्वच्छता असावी, प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यात यावे, बसस्टॅन्डमध्ये इन व आऊट स्वतंत्र मार्ग असावेत, बसबाबतीत विविध माहिती साठी सुचना फलकाचा उपयोग करावा, याविषयी उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन आगार प्रमुख (प्रभारी) यांनी आश्वासन दिले. यापुढे प्रवासी हित जोपासले जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here