करवीर (रिपोर्टर संजय पाटील) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर,यांच्या जयंती निमित्त तसेच मराठी पत्रकारिता दीना निमित्त महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई,शाखा कोल्हापूर ,यांच्यावतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
मराठीमध्ये पाहिले वर्तमानपत्र दर्पण सुरू करणाऱ्या बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म दिवस 6 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो, या दिवसाचे औचित्य साधून दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता कोल्हापूर शाखेच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना मान्यवरांनी अभिवादन करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी मा.श्री श्रेयश भगवान(उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र),श्री .चंद्रकांत पाटील(जिल्हाध्यक्ष),श्री कृष्णात चौगुले (जिल्हा उपाध्यक्ष),श्री सुरेश पाटील (जिल्हा सचिव),श्री दत्तात्रय बोरगे(कार्याध्यक्ष),श्री प्रमोद व्हनगुते(कोल्हापूर शहराध्यक्ष), तसेच मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते.







