कोल्हापूर शहर वाहतूक विभागाची मोठी कारवाई, अनधिकृत कर्कश्य आवाजाचे सायलन्सर केले नष्ट

कोल्हापूर

कोल्हापूर (प्रतिनिधी अनिल सांगळे) : वाहतूक विभागाकडून कर्कश्य, मॉडिफाय, केलेले तसेच बेकायदेशीर बसवलेले सायलन्सर, आज (दि १० जानेवारी) दसरा चौक येथे नष्ट करण्यात आले.

 

कोल्हापूर शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्यातच हौस म्हणून गाड्यांचे कंपनी फिटिंग केलेले सायलन्सर काढून, त्याजागी बेकायदेशीर मॉडिफाय केलेले कर्कश आवाजाचे सायलन्सर बऱ्याच वाहनांना बसवल्यामुळे शहरातील वृद्ध,आजारी रुग्णांना ,विद्यार्थ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्याचप्रमाणे शहरातील ध्वनी प्रदूषणाच्या समस्या वाढत चालल्या आहेत, याची दखल घेत पोलिस अधीक्षकांनी शहर वाहतूक शाखेला अश्या वाहनावर कारवाई करण्यास सांगितले होते.

 

या आदेशानुसार शहर वाहतूक शाखेने अश्या वाहनावर कारवाई करत ७३७ सायलेन्सर जप्त करून सुमारे १२ लाख रु इतका दंड वसूल केला.जप्त केलेल्या सायलन्सर वर दसरा चौक या ठिकाणी रोड रोलर फिरवून हे सायलन्सर नष्ट करण्यात आले.पोलिसांच्या या कारवाईचे शहर वासीयाकडून समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here