पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जेष्ठ शिवसैनिक व भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक काकासाहेब बुराडे यांचे वडील कै पैलवान बाबुराव अनंतराव बुराडे यांचे वृद्धपकाळाने सोमवारी (दि.६) रोजी पुणे येथे वयाच्या ९३ व्या वर्षी दुखद निधन झाले.
कै पैलवान बाबुराव बुराडे हे जुन्या पिढीतील नामांकित पैलवानां पैकी एक होते त्यांनी त्या काळात अनेक नामवंत पैलवानां बरोबर कुस्त्या केल्या होत्या. त्यांना सोनार समाजाची सखोल माहीती होती त्यांनी आपल्या हायातीत अनेकांची लग्ने जमवून ती पार पाडली समाजात त्यांचा वेगळा नावलौकिक होता बाबुराव मलठणकर या नावाने ते परिचित होते. त्यांच्यावर हिंदूहद्यय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा पगडा अखेर पर्यंत होता.
हिंदूहदय सम्राटांच्या विचाराने प्रेरित होऊन १९७८ साली त्यांनी भगवा हातात घेतला. अखेरच्या श्वासा पर्यंत ते शिवसैनिक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात दोन मुले दोन सुना तीन मुली जावई, नात जावई, नातवंडे, परतवंडे असा मोठा परीवार आहे. अनेकांनी बुराडे परीवाराचे समक्ष व फोन द्वारे सात्वन केले.







