मोहोळ तालुक्यातील २०२४-२५ मे व जून महिन्यातील अवकाळी अतिवृष्टीत झालेल्या नुकसानीची भरपाई तात्काळ मिळावी – चरणराज चवरे

नुकसानीची भरपाई

पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) : मागील काही वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाच्या झळा भरपूर प्रमाणामध्ये लागल्या होत्या त्यामध्येच सन २०२४ मध्ये चांगल्या प्रमाणात पाऊस झाला व शेतकरी सुखावला परंतु नैसर्गिक आपत्ती म्हणजे पावसाळा झाल्यानंतर अवकाळी पावसाने सन २०२४ माहे मे व जून महिन्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे व अतिवृष्टी मुळे मोहोळ तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्याच्या द्राक्ष,डाळिंब, पेरू पिकांचे तसेच घराचे,गुरांचे गोठे तसेच जनावर यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आलेले होते,परंतु अद्यापही नुकसानग्रस्त लाभार्थी शेतकरी बांधवाना त्या नुकसानीची भरपाई अदा करण्यात आलेली नाही.

 

तत्काळ नुकसान भरपाई न मिळाल्यास शासन दरबारी दाद मागणार
मोहोळ तालुक्यातील 2024 मे व जून यामहिन्या मधील झालेल्या अतिवृष्टी ने बऱ्याच शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले आहे.शेतकरी आपल्या काबाड कष्टाने त्या ठिकाणी आपले पीक आणतो आणि अवकाळी पावसाने,वाऱ्या कावदानाने तेच पीक उध्वस्त होते.त्यावेळेस सर्वसामान्य शेतकरी कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो.पिके सोडून कोणाच्या घरावरील पत्रे,जनावर मृत्यूमुखी पडणे,गोठाशेड सर्व प्रकारचे पिके हे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्या बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा झाल्यास त्या शेतकऱ्यांना दिलासा मिळून त्यांचा संसारास हातभार लावण्यास मदत होईल. तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास शासन दरबारी सुद्धा दाद मागण्यासाठी प्रयत्नशील राहणार.
– चरणराज चवरे, सोलापूर नियोजन समिती सदस्यता शिवसेना जिल्हाप्रमुख.

 

तरी सदर नुकसान भरपाई नुकसानग्रस्त शेतकरी बांधवाना लवकरात लवकर व तात्काळ त्यांच्या खातेवर जमा करणेबाबत आपले स्तरावरून योग्य ती कार्यवाही व्हावी अशा आशयाचे लेखी निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख तथा सोलापूर नियोजन समिती सदस्य चरणराज चवरे यांनी पंढरपूर प्रांत अधिकारी सचिन इथापे व मोहोळ तहसीलदार सचिन मुळीक यांच्याकडे केली आहे. यावेळी सोलापूर नियोजन समिती सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे पेनूरचे उपसरपंच सागर मास्तर चवरे,पैलवान बाळासाहेब चवरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here