सोलापूर (जिल्हा क्राइम रिपोर्टर राहुल मस्के) : मोहोळ तालुक्यातील सिकंदर टाकळी येथे मकर संक्रांतीच्या सणाच्या औचित्य साधून शाळेमध्ये बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिकंदर टाकळी याप्रसंगी विद्यार्थिनी विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाल्यांचे व वस्तूंचे पूजन करून बाल आनंद बाजाराचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य श्री धर्मराज वसेकर डॉक्टर राहुल वसेकर व उपस्थित सर्व ग्रामस्थ यांच्या हस्ते करण्यात आले आजच्या या बाजारात सर्व प्रकारच्या भाजीपाला फळे स्टेशनरी सौंदर्यप्रसाधने फुलांचे हार व गजरे किरसुण्या शैक्षणिक तक्ते रांगोळीचे छाप गॉगल इलेक्ट्रिक साहित्य खाऊ गल्ली मध्ये चहा भजी पॅटीस मंचुरियन भेळ पाणीपुरी आणि शेव चिवडा इत्यादी विविध पदार्थ विद्यार्थिनींनी विक्रीसाठी आणले होते.
विद्यार्थिनींनी विक्रीसाठी जे पदार्थ बाजारात आणले होते त्यासाठी पालकांचे विशेष कष्ट असल्याचे दिसून आले आजचे या बाजाराच्या टाकळी ग्रामस्थ सोबतच विद्यार्थिनीचे पालक विशेष करून मोठ्या संख्येने महिलावर्ग प्रतिष्ठित नागरिक विविध अधिकारी पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने भेट दिली विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात व्यावहारिक ज्ञानाचा अनुभव देण्याच्या उद्देशाने या बाल आनंद बाजाराचे आयोजन करण्यात आले होते आजच्या या बाण आनंद बाजाराच्या निमित्ताने उपस्थित सर्वांनी शाळा प्रशासनाच्या नियोजनाचे मनापासून कौतुक केले आजचा हा बाल विकास आनंद बाजार उपक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री सागर गुरुजी डोके गुरुजी चव्हाण मॅडम येवले मॅडम गवळी मॅडम गोडसे मॅडम येवले गुरुजी तसेच सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक याने विशेष कष्ट घेतले.







