सापळा रचून देवळा पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जगतापला लाच घेताना रंगेहाथ पकडले

देवळा पोलीस स्टेशन

नाशिक (प्रतिनिधी कुबेर जाधव) : देवळा पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दि. १८ शनिवार रोजी दुपारी एक महत्त्वाची कारवाई केली. पथकाने एक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) रंगेहाथ लाच घेताना पकडले. संबंधित अधिकारी एका प्रकरणातील तपासासाठी नागरिकांकडून लाच मागत होता.यावेळी त्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले. या कारवाईमुळे पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा एक गंभीर मुद्दा उघडकीस आला आहे.

 

 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदारास गुन्ह्यात अटक न करता मदत करण्यासाठी वीस हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून सदर माहिती दिली होती. यावेळी तक्रारदाराकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास यशवंत जगताप यांना रंगेहात पकडण्यात आले.

 

यापूर्वीही सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलास जगताप यांनी दोन लाख पाच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे त्यांनी स्वत: कबूल केले. यामुळे त्यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पोलीस दलाच्या कामकाजावर काळा डाग ठेवणारी असून, त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता अधोरेखित करते. लोकांचा पोलिस यंत्रणेशी विश्वास उधळला जात आहे, त्यामुळे यापुढे अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाईची आवश्यकता आहे. लाचलुचपत विरोधी विभागाने या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

सदर कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील, व सापळा पथक पोलीस हवालदार सुनील पवार, संदीप वनवे, योगेश साळवे, चालक परशुराम जाधव यांच्या पथकाने वरील कारवाई केली.

 

विशेष म्हणजे अवैध गुन्हेगाराचा अड्डा असलेल्या लोहोणेर बिटचे जगताप हेच प्रमुख होते, देवळा पोलिस ठाण्यात कोणीही वरीष्ठ अधिकारी आले तरी यांच्या मर्जी शिवाय त्यांचे काहीही चालत नव्हते, नाही म्हणायला गेल्या दोन महिन्यांपासून अवैध वाळू उपसा व मटका गावटीदारु इत्यादी अवैध धंद्यांना ब्रेक लागला होता, त्यातून हे प्रकरण समोर आल्याने खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here