मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीची विषारी औषध घेऊन आत्महत्या

आत्महत्या
file photo

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत फसवणुकीतून झालेल्या मानसिक धक्क्यातून पल्लवी पोपट फडतरे (वय २५) या महिला डॉक्टरने क्लिनिकमध्ये विषारी औषध घेत आत्महत्या केली. कुलदिप आदिनाथ सावंत याने या डॉक्टर महिलेची फसवणूक केली असून, कुलदीप सावंत विरोधात पुण्यातील बिबवेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिले लग्न झाले असतानाही जीवनसाथी डॉटकॉम संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे भासवून तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर तिला आपले लग्न झाले असून पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे मानसिक धक्क्यातून डॉक्टर तरुणीने विषारी औषध घेऊन आपल्या क्लिनिकमध्ये आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

संकेतस्थळावर अविवाहित असल्याचे सांगून लग्नाचे आश्वासन देत फसवणूक केल्याने पल्लवी पोपट फडतरे (वय २५) यांनी आयुष्य संपवले. तिच्या वडिलांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कुलदीप आदिनाथ सावंत (वय ३०, रा. शंकर कॉलनी, सांगली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुलदीपने लग्नाचे आमिष दाखवून पल्लवीकडून १० लाख रुपये घेतले होते, नंतर त्याने आपली पत्नी गर्भवती असल्याचे सांगितले. या धक्क्यातून पल्लवीने आत्महत्येचे पाऊल उचलले. पोलिसांनी याप्रकरणी कुलदीप विरोधात गुन्हा दाखल केलाय. कुलदीप याचा पोलीस शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here