बुलढाणा (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात एक खळबजनक घटना घडली. १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला मित्राच्या मदतीने जबरीने मोटरसायकलवर बसवलं. त्यानंतर परिसरातील हॉटेल निवांत येथे नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमासह आणि त्यास मदत करणाऱ्या मित्राविरुद्ध पोक्सोसह विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. १६ जानेवारी रोजी सकाळी साडेअकरा वाजेच्या दरम्यान १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळेत जात असताना आरोपी मोहन उर्फ राज चव्हाण (वय २०, रा. खंडाळा देवी) यांनी पिढीतेस त्याच्या मित्र ओम पल्हाड अंदाजे यांच्या मदतीने मेहकर बायपासवरील हॉटेल निवांतच्या रूममध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर अत्याचार केला.
पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास डीवायएसपी प्रदीप पाटील हे करत आहे.







