निसर्ग मित्र समिती सिंधुदुर्ग यांच्या वतीने कोरोना योद्धा पुरस्काराने मान्यवरांचे झाले सत्कार

सावंतवाडी- छत्रपती शिवाजी महाराज राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त निसर्ग मित्र समिती धुळे, यांच्या वतीने सिंधुदुर्ग निसर्ग मित्र समिती शाखातर्फे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.यात देवगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कातिवले, जिल्हा परिषद सदस्य तथा आरोग्य सभापती लॉरेंस मानेकर,
तळेबजार बागतळवळे ग्राम पंचायतीचे सरपंच गणेश लाड,जांभवडे तालुका कुडाळ येथील डॉक्टर प्रशांत मडव, भरणी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कदम, वरेरी तालुका देवगड येथील सरपंच सौ.सुचिता राणे आदी मान्यवरांचा निसर्ग मित्र समिती शाखा सिंधुदुर्ग यांच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे निसर्ग मित्र समिती चे अध्यक्ष प्रा.नंदन घोगळे, सचिव रुपेश पाटील तसेच खजिनदार संतोष वरेरकर, परशुराम मोरे,महादेव चव्हाण, गुरुनाथ तेली,श्री.पडवळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात आले.सर्व मान्यवरांनी सदर पुरस्काराचा आदर राखत पुरस्कार पुरस्कारार्थी म्हणून आपले मनोगत व्यक्त केले. निसर्ग मित्र समिती सिंधुदुर्ग सातत्याने पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड, सेंद्रिय शेती, रानभाजी महत्त्व आदी विषयांवर समाजोपयोगी उपक्रम राबवित आहे. निसर्ग मित्र समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, डी.आर.पाटील, डॉ. सतीश पाटील यांनी सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here