धरणगाव तहसीलला छत्रपती क्रांती सेना व सहयोगी संघटनेतर्फे पदोन्नती मध्ये आरक्षण मिळावे यासाठी निवेदन

धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – पदोन्नती आरक्षण – रीजर्वेशन ईन प्रमोशन हा कर्मचार्‍यांचा हक्क व अधिकार आहे. मद्रास सर्वोच्च न्यायालयानेही तसा निकाल दिलेला आहे.भारतात आरक्षण मौलिक अधिकार आहे.(9 एप्रिल 1951)
परंतु प्रत्यक्षात शासन लागू करत नसल्यामुळे या संदर्भात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघच्या वतीने रिझर्वेशन इन प्रमोशन हा कायदा संविधान अनुसूची 9 मध्ये समाविष्ट करण्यात यावा करीता संपूर्ण देशभरात मा.राष्ट्रपतींना मा. नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले.
विक्रम सोनवणे यांचे नेतृत्वाखाली धरणगांव येथे निवेदन देण्यात आले. यावेळी छत्रपती क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण पाटील , प्रोटॉनचे अध्यक्ष सुनिल देशमुख सर , आकाश बिवाल सर , भारत मुक्ती मोर्चाचे अध्यक्ष गौतम गजरे , बुद्धीष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे तालुका संयोजक निलेश पवार , बहुजन क्रांती मोर्चाचे तालुका संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ , रईस मोमीन व विविध संघटना व त्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here