स्वातंत्र्यदिनी केतन भोज यांच्याहस्ते हिरकणी महाराष्ट्राची सन्मान तसेच महाराष्ट्राचे कोरोना योद्धा सन्मान सोहळा संपन्न

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – लांजा, तालुक्यातील कोचरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनी रोहित दादा पवार विचार मंचाचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष केतन भोज यांच्या हस्ते कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कोविड योद्धयांचा सन्मान करण्यात आला. कोरोना विरुद्ध लढत असलेल्या आरोग्य यंत्रणेचे जिल्ह्यातील कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.
कोरोनामुक्तीसाठी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे सौ. रुपाली बेंद्रे (सरपंच), आस्मा इलियास मणेर (आरोग्य सेविका), सौ. सुचिता बेंद्रे (मदतनीस), सौ. मयुरी सालपेकर (आशा सेविका), सौ. पूर्वा धावडे (आशा सेविका), दिक्षा तरळ (अंगणवाडी सेविका), गीतांजली पांचाळ (मदतनीस), दिपाली कांबळे (अंगणवाडी सेविका), सुलोचना पोवार (अंगणवाडी सेविका), दिपाली भातडे (मदतनीस) तर कोचरी गावचे चेतन दाभोळकर (ग्रामसवेक), प्रकाश बेंद्रे (पोलीस पाटील), भरत गुरव (कोतवाल) या सर्वांनी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता केलेले अमूल्य कार्य खुप लोकांना जीवनदान देऊन गेले व अजून दिवस रात्र काम करून ते आपले कर्तव्य बजावत आहेत. यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या पुढील कार्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी रोहित दादा पवार विचार मंचाचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष केतन भोज यांना हस्ते गावातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस, सरपंच यांचा “हिरकणी महाराष्ट्राची” सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तर पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक यांना “महाराष्ट्राचे कोरोना योद्धे” म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमासाठी कोचरी गावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वसंत बेंद्रे, लवू धावडे तसेच भोज यांचे मित्र सहकारी विलास बेंद्रे व इतर सर्व ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here