मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – लांजा, तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल, कोचरी येथील महाराष्ट्र राज्य
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी (एस.एस.सी) परीक्षेत कु. प्रतिक्षा प्रकाश बेंद्रे या विद्यार्थ्यांनीने ८९ टक्के गुण मिळवले आहेत. तसेच दिव्या श्रीधर कांबळे ८३.६० टक्के गुण व वैष्णवी संतोष गुरव ८२.२० टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे या तिन्ही विद्यार्थींचा स्वातंत्र्य दिनी न्यू इंग्लिश स्कूल, कोचरी येथे त्यांच्या शिक्षकांच्या व कोचरी गावातील ग्रामस्थांच्या उपस्थित रोहित दादा पवार विचार मंचाचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष केतन भोज यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी भोज यांच्याकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. संपूर्ण लांजा तालुक्यात दरवर्षी दहावीला न्यू इंग्लिश स्कूल, कोचरी या शाळेचा शंभर टक्के निकाल लागतो. यावेळी या कार्यक्रमाला कोचरी गावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वसंत बेंद्रे, पोलीस पाटील प्रकाश बेंद्रे तसेच लवू धावडे उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाला भोज यांचे मित्र व सहकारी विलास बेंद्रे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.








