यावल (प्रतिनिधी अशोक तायडे) : दिनांक 22/1/25 रोजी यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय येथे भारतीय बहुउद्देशीय पत्रकार संघाची बैठक संस्थापक अध्यक्ष अय्युबजी पटेल यांच्या मागदर्शखाली बैठक घेण्यात आली.
या बैठकित सर्वानुमते जळगाव जिल्हा कार्यध्यक्ष पदी शब्बीर खान सरवर खान यांची निवड करण्यात आली . तर जिल्हा अध्यक्षपदी हर्षल अंबेकर यांची निवड करण्यात आली यावल तालुका अध्यक्ष फिरोज तडवी तर उपाध्यक्ष अशोक तायडे, ए.टी. चौधरी यांना यावल तालुका कार्याध्यक्ष पद देऊन नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जीवन चौधरी होते तर प्रास्ताविक रणजित भालेराव यांनी केले कार्यक्रमाला यावल तालुक्यातील पत्रकार जीवन चौधरी .एटी चौधरी दहिगाव मिलींद जंजाळे राजू पिंजारी साकळी . अशोक तायडे बाळासाहेब आढाळे रवींद्र आढाळे डोंगर कठोरा फिरोज तडवी महेलखेडी इम्रान पिंजारी आदी पत्रकार बाधव उपस्थित होते.







