येत्या २५ तारखेला स्वाभिमानी शेतकरी संघटनेची निफाड येथे कार्यकारिणीची बैठक

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची

नाशिक (प्रतिनिधी कुबेर जाधव) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेची नाशिक जिल्हा बैठक निफाड येथे शासकीय विश्रामगृह संपन्न होणार असून या जिल्हा बैठकीमध्ये राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनांची मागणीच्या अनुषंगाने विशेषता शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजेत ही प्रमुख मागणी असून कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क हटवावे तसेच सोयाबीन हमीभावाचे पोर्टल थोड्या काळा करता सुरु ठेवून शेतकऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या सरकारचा या बैठकीत निषेध करण्यात आहे.

 

तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शेतकरी प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्ह्यात गावगाड्यातील शेतकऱ्यांचा प्रवेश करून व शेतकरी प्रश्नावर जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने बैठकीत संघट नात्मक बांधणी तयार करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून जिल्ह्यात जाळे निर्माण व्हावे म्हणून संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी नेतृत्वाला नवीन तरुणांची ताकद तयार करून शेतकरी प्रश्नावर आवाज उठवणार असल्याचे जिल्हाध्यक्ष श्री निवृत्ती गारे पाटील सुधाकर भाऊ मोगल यांनी कळविले आहे.

 

बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून राज्य समन्वयक कुबेर बापू जाधव, पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजू शिरसाठ कृष्णा घुमरे ,तुषार शिरसाट अशोक शेवाळे आत्माराम पगार गजानन आबा घोटेकर मच्छिंद्र जाधव रवींद्र शेवाळे ,भाऊसाहेब तासकर संजय जाधव रवींद्र तळेकर, कैलास कोकरे,बंडु आढाव, कळवण तालुका अध्यक्ष रामकृष्ण जाधव संदीप उपाळे उपस्थित राहणार आहे. तरी जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here