ठाणे (प्रतिनिधी लक्ष्मीनारायण वनम) : विष्णूनगर पोलीस स्टेशन हद्दीत सिद्धार्थ नगर ऐश्वर्या हॉटेल जवळ डोंबिवली पश्चिम येथे एक इसम गांजा हा अंमली पदार्थ विक्री करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली.
त्या अनुषंगाने परिमंडळ तीन हद्दीत कारवाई करण्याकरता नेमलेल्या पथकातील पीएसआय चव्हाण, पीसी 8135 गौतम जाधव, पीसी 2898 गुजर, पीसी 6102 सोनवणे असे गांजा विक्री करणारा इसम नामे लीलाधर सुरेश ठाकर (वय ३५ वर्ष राहणार कोपर क्रॉस रोड सिद्धार्थ नगर हनुमान मंदिरा शेजारी डोंबिवली वेस्ट) त्याच्या ताब्यात एकूण 80,175/- रुपये किंमतीचा ३२०७ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ विक्री करताना मिळून आल्याने त्याच्यावर विष्णू नगर पोलीस स्टेशन गु. र. नंबर 58/2025 एन डी पी एस ऍक्ट 8(क), 20(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







