रेल्वे अपघातातील जखमींची केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी घेतली भेट

रक्षाताई खडसे

सावदा (प्रतिनिधी अजहर खान) : जळगांव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील परधाडे रेल्वे स्थानक जवळ भीषण रेल्वे अपघातात जखमी झालेल्या काही प्रवाशांना जळगांव येथील गोदावरी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले असून, आज केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जखमी प्रवाशांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

 

तसेच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना योग्य सूचना देत सर्वांना उत्तम उपचार मिळावेत असे केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे निर्देश देऊन, जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद यांचे कडून रेल्वे अपघातातील जखमी प्रवासी व घटनेची माहिती घेतली.

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा ते माहिजी रेल्वे स्थानकदरम्यान परधाळे स्टेशनजवळ पुष्पक एक्स्प्रेसला आग लागण्याच्या अफवा पसरल्याने प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी या उड्या मारल्या होत्या. मात्र, त्याचवेळी भुसावळकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसनं अनेकांना चिरडले. या भीषण अपघातात आतापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून इतर जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here