दख्खनचा राजा श्री जोतिबा देवांची मूळ मूर्ती शनिवारपासून दर्शनासाठी खुली

jyotiba

पन्हाळा (प्रतिनिधी अनिल सांगळे) : ज्योतिबा देवस्थान मुळ मूर्ती सुस्थितीत राहणेच्या अनुषंगाने, भारतीय पुरातत्व विभाग दिल्ली व पुणे यांचेकडून मूर्ती संवर्धनाच्या अनुषंगाने अहवाल देण्यात आला होता.

 

या अहवालानुसार दिनांक २१ जानेवारी २०२५ पासून दिनांक २४ जानेवारी २०२५ पर्यंत भारतीय पुरातत्व विभागामार्फत मूर्तीचे रासायनिक संवर्धनाचे काम चालू होते, या काळात श्री केदारनाथ(जोतिबा) देवांच्या मूळ मूर्तीचे दर्शन हे बंद करण्यात आले होते.हे संवर्धनाचे काम शुक्रवार दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी पूर्ण झाले.

 

शनिवार दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी , श्रींच्या मुख्य पुजाऱ्यांच्या हस्ते सर्व धार्मिक विधीयुक्त पूजन करून प्राणप्रतिष्ठापणा विधी पार पडला, त्यानंतर श्रीं केदारनाथ(जोतिबा) देवांची मूळ मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात आली, या कार्यक्रमावेळी परमपूज्य परमात्मराज महाराज (श्री दत्त देवस्थान मठ श्रीक्षेत्र आडी ),श्री.अमोल येडगे जिल्हाधिकारी कोल्हापूर,श्री.शिवराज नायकवडी सचिव ,(पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर),श्री.धैर्यशील तिवले, (ऑफिस इनचार्जे केदारलिंग देवस्थान वाडीरत्नागिरी) तसेच ग्रामस्थ ,पुजारी, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here