वरंध घाटात १०० फूट खोल दरीत कार कोसळून भीषण अपघात

accident
file photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) : भोर येथे भोर-महाड महामार्गावर असणाऱ्या वरंध घाटात एक भीषण अपघात झाला. यामध्ये इको कार थेट १०० फूट खोल दरीत कोसळून अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून, 8 जण जखमी झाले आहेत. महाडवरून भोरच्या दिशेने इको ही कार येत होती. तेव्हा ही दुर्घटना घडल्याची माहिती दिली जात आहे.

अपघातात शुभम शिर्के हा तरुण मृत्यूमुखी पडला आहे तर, मंगेश गुजर (वय २६) , आशिष गायकवाड (वय २९), सिद्धार्थ गंधणे (वय २६), सौरभ महादे (वय २२), गणेश लवंडे (वय २७), अमोल रेकीणरं (वय २७), यशराज चंद्र (वय २२), आकाश आडकर (वय २५) हे जखमी झाले आहेत. वाहनचालकाचा वळणावर अंदाज चुकल्याने चारचाकी इको कार १०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, महाडवरून भोरच्या दिशेने इको कार येत होती. त्यात नऊपेक्षा अधिक जण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे. इको गाडी वरंध घाट परिसरात असणाऱ्या उंबरडे गावाजवळ पहाटे चारच्या सुमारास ही गाडी १०० फूट खोल दरीत कोसळली. वाहनचालकाचा वळणावर अंदाज चुकल्याने हा अपघात घडल्याचं सांगितलं जात आहे.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना गाडीतून बाहेर काढत वर रस्त्यापर्यंत आणले. त्यानंतर पोलिसांच्या मदतीने स्थानिक शिरगांव रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पोलिसांच्या मदतीने जखमींना बाहेर काढले. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here