अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरुणीने केली आत्महत्या

sucide

जळगाव (प्रतिनिधी निलेश पाटील) : कानळदा येथे हौदामधील पाण्यात झोपून प्रियंका रवींद्र भंगाळे (३१, रा. कानळदा, ता. जळगाव) या अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या तरुणीने आयुष्य संपविले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रियंका पुणे येथे नोकरीलादेखील होती. दोन वर्षांपूर्वी ती नोकरी सोडून गावी येवून आई-वडिलांसोबत राहत होती. शनिवारी सकाळी घराच्या मागे गुरांच्या गोठ्यानजीक असलेल्या खोल पाण्याच्या हौदात असलेल्या झोपून तिने आपले जीवन संपविले.

 

तरुणी पाण्यात बुडलेल्या अवस्थेत तिच्या काकांना दिसली. त्यांनी तात्काळ तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. पोलिस पाटील नारायण पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्या वेळी पोहेकॉ अनिल फेगडे, संजय भालेराव यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here