पुडुचेरी (वृत्तसंस्था) : श्रीलंकेच्या नौदलाने मंगळवारी डेल्फ्ट बेटाजवळ केलेल्या गोळीबारात पाच भारतीय मच्छिमार जखमी झाले. भारताने दिल्लीतील श्रीलंकेच्या कार्यवाहक उच्चायुक्तांकडे याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. कोलंबोमधील भारताच्या उच्चायुक्तांनीही श्रीलंकेच्या सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयासमोर हा मुद्दा उपस्थित केला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
कराईकल (पुडुचेरी) आणि तामिळनाडू येथील १३ मच्छिमारांपैकी दोन मच्छिमार गंभीर जखमी झाले आहेत. अटकेदरम्यान गंभीर दुखापत झाली, असे वृत्त पीटीआयने दिले आहे. दोघांनाही जाफना रुग्णालयात देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली आहे. इतर तीन मच्छिमारांना किरकोळ दुखापत झाली आहे आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उर्वरित मच्छिमारांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
जाफना येथील भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी “त्यांच्या कल्याणासाठी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आहे आणि मच्छिमार आणि त्यांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करत आहेत, श्रीलंकेच्या नौदलाने डेफ्ट बेटानजीक आंतरराष्ट्रीय सागरी सीमा ओलांडून मासेमारी करत असल्याचा आरोप करत ही अटक करण्यात आली. मच्छिमार वापरत असलेले एक यांत्रिक जहाजही जप्त करण्यात आले आहे, असं वृत्त पीटीआयने दिलं आहे.
पुडुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगास्वामी यांनी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना पत्र लिहून सर्व अटक केलेल्या मच्छिमारांच्या सुटकेसाठी श्रीलंका सरकारसोबत प्राधान्याने योग्य पावले उचलण्याची विनंती केली आहे, असे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.







