भरधाव वाहनाच्या धडकेत रॉंगसाईड येणा-या दुचाकीस्वाराचा मृत्यू

dead-body
file photo

पुणे (उपसंपादक मीरा आरेकर) – मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर विरुद्ध दिशेने निघालेल्या दुचाकीस्वार सूरज देवेंद्रपंत लांडे (वय २७, रा. शिरजगाव कसबा, ता. चांदूर बाजार, जि. अमरावती) या तरुणाचा भरधाव वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वाहनचालकावर गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रणीत दिलीप गोंडेकर (वय २४, रा. योगानंद पीजी. हिंजवडी फेज एक) याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, २१ जानेवारी रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास प्रणीत अणि सूरज मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गाने दुचाकीवरुन निघाले होते. चांदणी चौकापासून काही अंतरावर त्यांनी दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबविली. दोघे लघुशंकेसाठी गेले. नंतर सूरज दुचाकी घेऊन विरुद्ध दिशेने निघाला. त्या वेळी समोरुन येणाऱ्या भरधाव वाहनाने अंधारात दुचाकीस्वार सूरज याला धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या सूरजचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला. पोलीस हवालदार शेलार अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here