नाशिक (उपसंपादक कुबेर जाधव) : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्करराव भगरे यांनी सोमवारी ( दिं २७) अचानक विठेवाडी,सावकी येथे भेट देऊन विठेवाडी सावकी येथील जुन्या ब्रिटिश कालीन बंधाऱ्याची पहाणी केली.
यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी गावित , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव, यांच्या समवेत पहाणी केली,असता जागेवरच मालेगाव चे कार्यकारी अभियंता ढाके यांना फोन करून दुरुस्ती बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत, लोकसभा मतदारसंघाचे खासदार खामखेडा व विठेवाडी येथे आले असता स्थानिक शेतकऱ्यांनी भेट घेऊन बंदचा दुरुस्तीची मागणी केली होती,
पाणी असल्याने सर्वे ( पहावी) करता येत नव्हती,मात्र सद्या पाणी कमी झाल्याने,आज खासदार भगरेनी दिलेल्या आश्वासना नुसार प्रत्यक्ष पाहणी करून पाटबंधारे विभाग कळवणचे शाखा अभियंता डि,बी, गावित, स्थापत्य अभियंता एस एम भोये, यांना दुरुस्ती संदर्भात सुचना दिल्या दुरुस्ती संदर्भात पहाणी केली,व मोजमाप घेतले, यावेळी स्थानिक शेतकरी कुबेर जाधव,( विठेवा डी) , वसंत बोरसे,धनंजय बोरसे ( सावकी) ,आदी शेतकरी उपस्थित होते.







