पंढरपूरात खासगी आधार केंद्र चालकांकडून नागरिकांची लूट

आधार केंद्र
file photo

पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) : सरकारी आधार कार्ड केंद्रावर आधार कार्ड काढण्यासाठी मोठी गर्दी असल्यामुळे शहरातील नागरिक , शालेय विद्यार्थी ,पालक, व महिला वर्ग खाजगी आधार केंद्राचा सहारा घेतात. नवीन आधार कार्ड काढनेकरिता, आधार कार्ड दुरुस्ती करिता , बायोमेट्रिक अपडेट करण्याकरिता तसेच आधार कार्डवरील पत्ता फोन नंबर, अपडेट करण्याकरिता नागरिक शहरातील विविध आधार केंद्राचा सहारा घेतात. मात्र याच खासगी आधार केंद्राकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याचे दिसून येत आहे.. खासगी आधार केंद्र चालक नागरिकांकडून आधार कार्ड अपडेट करण्यासाठी दोनशे ते पाचशे रुपये घेतले जात आहेत. यामुळे नागरिकांची आर्थिक लूट होत असून, खासगी केंद्र चालकांवर कारवाईची करण्याची मागणी केली जात आहे.

 

सरकारी योजनांचा लाभ, बँका, शाळा, कॉलेज आदी ठिकाणी आधार कार्डची सक्ती केली जात आहे. आधार नसेल, तर शासकीय योजनांच्या लाभांपासून निराधार राहावे लागते. विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेशासाठी आधारची मागणी केली जाते. तसेच सध्या लाडकी बहीण योजना सुरू असून या लाडकी बहीण योजनेमध्ये सहभागी होण्याकरिता महिलांचे आधार कार्ड अपडेट असणे गरजेचे आहे आणि याचाच फायदा घेऊन खासगी आधार कार्ड केंद्र आणि नगरपालिकेतील जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागातील कर्मचारी यांनी गोरख धंदा सुरू केला असल्याचे दिसून येत आहे.

 

आधार कार्ड अपडेट करण्याकरिता किंवा आधार कार्ड काढण्याकरिता जन्माच्या दाखलाची गरज असते मात्र दाखल असताना सुद्धा दाखल्यावरील नाव मराठीत आहे. इंग्रजीमध्ये करून आणा तर काहींना इंग्रजीमध्ये नाव आहे मराठीत करून आणावे, नावातील स्पेलिंग चुकीची आहे .जन्मतारीख चुकीची आहे इत्यादी दुरुस्त करून आणा. अशा आशयाची मागणी खाजगी आधार केंद्राकडून केली जाते. व संबंधित व्यक्तीला नगरपालिका जन्म व मृत्यू नोंदणी विभागातील अमुक तमुक व्यक्तीला भेटण्यास सांगितले जाते. तो व्यक्ती त्या ठिकाणी पोचण्यापूर्वी संबंधित कर्मचाऱ्याला खासगी आधार केंद्र चालकाकडून फोनद्वारे कल्पना दिली जाते. दोघांमध्ये फोनवरून संबंधित व्यक्तीची मानसिक स्थिती आणि त्याला हवे असलेल्या कागदाची गरज बोलली जाते. आधार केंद्र चालक आणि नगरपालिकेतील कर्मचारी यांच्या मिलीभगत असून यामधून संबंधित व्यक्तीकडून जन्माचा दाखला दुरुस्ती करण्याकरिता दोन ते तीन हजार रुपयाची रक्कम घेतली जाते. संबंधित रकमेची कुठल्याही प्रकारची पावती अथवा पोचपावती दिली जात नाही.

वास्तविक पाहता जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यामध्ये बदल करण्याकरिता नाममात्र फी राज्य शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. मात्र अशा पद्धतीने नगरपालिका प्रशासनातील जन्म आणि मृत्यू विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मिलीभगतीतून आधार केंद्र चालक नागरिकांची लूट करत आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी योग्य ती कारवाई करणे अपेक्षित असल्याची भावना संबंधित नागरिकांकडून केली जात आहे.

सध्या राज्यातील चर्चेत असलेली लाडकी बहीण योजना, तसेच राज्य शासनाकडून दिल्या जाणार्‍या विविध योजनाच्या लाभासाठी आधार नंबरची सक्ती केली जाते. अनेकांनी विविध कारणास्तव मोबाईल नंबर आणि पत्ता बदलले आहेत. लग्नानंतर महिलांचे नाव बदलते. अशा विविध कारणांसाठी आधार कार्ड अपडेट नसल्यास नागरिकांना शासकीय योजनाचा लाभ मिळत नाही. आधार कार्डवर अपडेट मोबाईल नंबर नसल्यास शासकीय योजनांचा ओटीपी मिळत नाही. आधार कार्ड नसल्यास विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश मिळत नाही . यामुळे आधार कार्डवर मोबाईल नंबर, पत्ता आणि नाव अपडेट करण्यासाठी नागरिक पंढरपूर शहरातील खाजगी आधार केंद्रावर जातात. यावेळी खाजगी आधार केंद्राकडून नागरिकांची मोठ्या प्रमाणात लुक केली जात असून आधार काढण्याकरिता केंद्र शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने जी फी आकारली आहे त्या फीच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रक्कम देखील घेतली जात आहे.

पंढरपूर शहरातील विविध आधार केंद्रावर आधार कार्ड अपडेट करण्यासाठी किंवा नवीन आधार कार्ड काढण्यासाठी गेलेला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अवाढव्य रक्कम घेतली जात आहे. पंढरपूर नगरपालिका प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांचे संबंधित आधार केंद्राशी लागेबांधे असल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे बोलले जात आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या आधार कार्ड काढण्याकरिता जन्माच्या दाखल्याची मागणी केली जाते मात्र जन्माच्या दाखल्यावर क्यूआर कोड असावा असे म्हणले जाते जर क्यूआर कोड नसेल तर क्यूआर कोड अपडेट असलेला दाखला नगरपालिकेतून घेऊन या असे सांगितले जाते नगरपालिकेत गेल्यानंतर त्या ठिकाणी सदर दाखला अपडेट नसल्याचे सांगितले जाते अपडेट करण्यासाठी नगरपालिका जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागाच्या वतीने नागरिकाकडून दोन ते तीन हजार रुपये एवढी मोठी रक्कम एका दाखल्यासाठी घेतले जातात. अशा आशयाची कैफियत एका तक्रारदाराने रोखठोकशी बोलताना सांगितले.

वास्तविक पाहता जन्माच्या दाखल्यामध्ये नावामध्ये अथवा स्पेलिंग मध्ये कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करायची असल्यास त्याकरता कोणत्याही प्रकारचे शुल्क लागत नाही किंवा ना मात्र शुल्क आकारले जाते मात्र पंढरपूर नगरपालिकेतील जन्म व मृत्यू नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे मोठ्या प्रमाणात थैमानच घातले असल्याचे दिसून येत आहे.

दुसरीकडे अपडेट झालेला दाखला घेऊन संबंधित व्यक्ती आधार कार्ड काढण्याकरिता पंढरपूर शहरातील खाजगी आधार केंद्रावर पुन्हा गेल्यानंतर त्या आधार केंद्र चालकाकडून त्या व्यक्तीला पैशाची मागणी केली जाते. वास्तविक पाहता आधार कार्ड काढण्याकरिता नाममात्र फी असताना देखील खासगी आधार केंद्र चालकाकडून 200 ते 500 रुपये घेतले जातात. आधार अपडेट करायचा असेल तर 200 ते 300 रुपये घेतले जातात. नाव किंवा पत्त्यातील बदल करायचा असेल तर 200 ते 500 रुपये घेतले जातात.

वास्तविक पाहता एखाद्या आधार कार्ड जर खाजगी आधार केंद्रावरून दुरुस्ती करायचे असेल तर नाममात्र पन्नास रुपये व पत्त्यातील बदल असेल तर नाममात्र शंभर रुपये फी आकारण्याची शासन स्तरावर आदेश असताना देखील शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून पंढरपुरातील खाजगी आधार केंद्र चालक नागरिकांची लूट करत असल्याचे दिसून येत आहे

नवीन आधार कार्ड काढणे, तसेच आधार कार्ड अपडेट करण्यासाठी शासकीय शुल्क ठरलेले आहे. त्या शुल्कापेक्षा जास्त रक्कम घेतले असल्यास नागरिकांनी संबंधित केंद्रांची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करावी. यानंतर संबंधित केंद्रावर कारवाई केली जाईल.
-सचिन ईतापे, उपजिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी पंढरपूर

याबाबत संबंधित नागरिकांनी खाजगी आधार केंद्र चालकाला एवढे पैसे का घेता, असे विचारणा केल्यास आधार केंद्रावरील कर्मचारी नागरिकांना अरेरावीची भाषा वापरतात. त्यामुळे पंढरपुरातील सर्वसामान्य नागरिक आर्थिक लूट सहन करीत आधार अपडेट करीत आहेत. दरम्यान, ग्रामीण भागातील एक व्यक्ती आधार कार्ड काढण्यासाठी आली असता विद्यार्थ्यांकडून खासगी आधार केंद्राकडून साडेतीनशे रुपये फी घेतली असल्याचे दिसून आले. शालेय विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढण्याकरिता साडेतीनशे रुपये ते चारशे रुपयांचा दर सर्व खाजगी आधार केंद्र चालकांनी फिक्स केले असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.

वास्तविक पाहता अशा प्रकारची कोणतीही फी शासनाने जाहीर केलेली नसताना पंढरपुरात हा गोरख धंदा मात्र जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे. सध्या आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू असल्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्यांचा आधार कार्ड काढण्याकरिता खाजगी आधार केंद्राचा सहारा घेत आहेत. पालकांची गरज आणि त्यांना लागणारे आधारची गरज पाहता खाजगी आधार केंद्र चालकाकडून त्यांची लूट केली जात असल्याचे दिसून येत आहे

 

पोस्ट ऑफिसमध्ये आधार काढण्यासाठी प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे नागरिक खासगी आधार केंद्राकडे जातात. मात्र, हे केंद्रचालक नागरिकांची लूट करीत आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी शाळेत आधार कार्ड नोंदणी मोहीम राबविली पाहिजे आणि आधार कार्डसाठी आर्थिक लूट करणार्‍यांवर कारवाई केली पाहिजे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here