पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : चाकण पोलीस स्टेशन कडील डी बी पथकाकडून चाकण पोलीस ठाणे हद्यीतील खंडणीसाठी अपहरण करून जबरदस्तीने रक्कम चोरणारे रिक्षा चालकांना व मोबाईल फोन चोरी करणा-या टोळीला दोन तासाच्या आत अटक करून २ लाख रूपये किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.
२५/०१/२०२५ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला चाकण पोलीस स्टेशन कडे कंपनीत काम करणा-या परप्रांतीय व्यक्ती गिरीश सूरेश यादव यास चाकण ते भोसरी रोडवरील भंडारा हॉटेल समोर २ अज्ञात रिक्षा चालकांनी त्याचें रिक्षात बळजबरीने चाकूचा धाक दाखवून बसवून आळंदी रोडवरील घाटामध्ये निर्जन ठिकाणी नेवून चाकूने वार करून फिर्यादीकडील मोबाईल फोन मधील गुगल पे मधून ४६,१९०/- रक्कम रूपये दूस-या गुगल पे नंबरला ट्रान्सफर करून लूटमार झाल्याची तक्रार प्राप्त झालेली होती. सदर बाबत तत्काळ सहा. पोलीस आयुक्त चाकण विभाग चाकण श्री. राजेंद्रसिंह गौर व चाकण पोलीस ठाण्याचे वपोनि श्री. प्रमोद वाघ यानी तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसह घटनेच्या ठिकाणी भेट दिली. चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ५१/२०२५ बीएनएस कलम १४० (२), (३) ३०८, ३(५) वगैरे याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. दाखल गुन्हयावरून चाकण पोलीस ठाणे कडील तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार यानी तत्काळ घटनेच्या ठिकाणी जावून फिर्यादीकडे अधिक विचारपूस केली असता फिर्यादीच्या सांगणेवरून आरोपींताच्या वर्णनावरून तसेच आरोपीनी गुन्हयात वापरलेल्या रिक्षाच्या मेकवरून तत्काळ रिक्षा मालकाचा शोध घेतला. तसेच परीसरातील सिसिटीव्ही यांची पाहणी करून आरोपींचा यशस्वी माग काढून आरोपी रहात असलेल्या परीसरामध्ये आरोपींचा सीसीटीव्ही मधील फोटोंची शहानिशा करून बातमीदारा मार्फत आरोपींचे नाव निष्पन्न केले. व त्यांना त्यांच्या राहते घरातून तत्काळ दोन तासाच्या आत ताब्यात घेतले असता त्यानी त्यांची नावे १) राजू भगवान गव्हाणे वय १९ वर्षे म्हाडा कॉलनी जवळ म्हाळुंगे खेड, पूणे २) अजय बालाजी भालेराव वय १९ वर्षे आंबेठाण सोनबळवस्ती खेड, पूणे असे असल्याचे सांगितले व गुन्हयाबाबत चौकशी केली असता त्यानी गुन्हा केल्याची कबूली तपास पथकाचे सपोनि प्रसन्न जराड व टिमला दिली. सदर गुन्हयात जबरीने घेतलेली रक्कम तसेच गुन्हयात वापरलेला हत्यार व मोबाईल फोन तसेच वापरलेला रिक्षा असे जप्त करून ताब्यात घेतले आहेत.
२६/०१/२०२५ रोजी तपास पथकातील अधिकारी व पोलीस अंमलदार रात्रगस्त दरम्यान पेट्रोलिंग करत असताना ३ संशयीत इसमांना ताब्यात घेवून त्यांचेकडे विचारपूस केली असता त्यांचेकडे चोरीचे मोबाईल फोन व एक लोखंडी कोयता मिळून आला. त्याबाबत चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ५३/२०२५ बी.एन.एस. कलम ३०५ (ए), ३ (५) व चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ५४/२०२५ आर्म अॅक्ट ४ (२५) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशा प्रकारे घरफोडी गुन्हयामध्ये आरोपी नामे १) रोहन शंकर दवणे २० वर्षे वराडे रोड टेकडी वस्ती, महाळुंगे, खेड, पूणे २) जितेंद्र श्रीगौतम राम वय ३५ इस्लामपूर, पेठ नाका, शिराळा, सांगली, मुळ सारंगपूर, थाना धुरामधाम, शिवान, राज्य बिहार यांचेसह एक आर्म अॅक्टमध्ये अल्पवयीन वि.सं.बालक यांस ताब्यात घेवून लोखंडी कोयता व मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.
अशा प्रकारे आरोपी चाकण पोलीस ठाणे कडील तपास पथकाने खंडणीसाठी अपहरण करून जबरी चोरी करणारी व मोबाईल फोन तसेच कोयत्याचा वापर करणा-या आरोपींना जेरबंद केले.चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ५१/२०२५ बीएनएस कलम १४०(२), (३) ३०८,३(५), १०९ (५), चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर५३/२०२५वी. एन. एस. कलम ३०५ (ए), ३ (५) व चाकण पोलीस ठाणे गुन्हा रजि नंबर ५४/२०२५ आर्म अॅक्ट ४ (२५), प्रमाणे उघड करुन एकूण २,०१,१९०/- रूपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
पोलीस आयुक्त, विनयकुमार चौबे, सह-पोलीस आयुक्त . शशिंकात महावरकर, अपर पोलीस आयुक्त, वसंत परदेशी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-३ . शिवाजी पवार, पोलीस आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांचे सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, गुन्हे . नाथा घार्गे, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी प्रसंन्न ज-हाड, गणपत धायगुडे, तपास पथकातील पोलीस अंमलदार ऋषिकूमार झनकर, सुनिल शिंदे, शिवाजी चव्हाण, हनुमंत कांबळे, भैरोबा यादव, राजु जाधव, रेवणनाथ खेडकर, सूनिल भागवत, सुदर्शन बर्डे, महेश कोळी, बिक्कड, शरद खैरणार, किरण घोडके, लंकावती हांडे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा अधिक तपास चालु आहे.







