भुसावळ (प्रतिनिधी गिरिश पवार) : मंगळवार (दि.२८) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावतर निंभोरा या शाळेला आय डी बी आय बँक भुसावळ यांच्याकडून ऑल इन वन प्रिंटर इस्कॉन कंपनीचे व यूपीएस देणगी स्वरूपात सप्रेम भेट देण्यात आली.
कार्यक्रमाला बँकेचे व्यवस्थापक आदरणीय श्रीपाद पुंडे साहेब , तसेच बँकेतील त्यांचे सहकारी आदरणीय स्वानंद झारे साहेब व आदरणीय मनीष सिन्हा साहेब , सावतर निंभोरा गावाच्या सरपंच सौ साधनाताई कोळी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर भाऊ सपकाळे, मा.पोलीस पाटील अरुण कोळी, मा . अनिल कोळी , सुरेश भाऊ सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ कोळी, शिक्षणप्रेमी जंगलू कोळी दादा,मुख्याध्यापक जी.एम. पाटील तसेच सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.
शाळेला प्रिंटर मिळाल्यामुळे शालेय कामकाज सोपे होणार आहे व त्यामुळे सर्व विद्यार्थी डिजिटल शिक्षणाकडे शिक्षणाकडे वळतील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय निंभोरे सर यांनी केले.आभार श्री.पाटील सर यांनी केले.







