महापालिकेचे सर्व कामकाज मराठीतून करा : संभाजी ब्रिगेडचे आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन

संभाजी ब्रिगेड

पुणे (प्रतिनिधी रोहन सोनाळे) : मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी प्रशासकीय कामकाज मराठीतून करणे आवश्यक आहे त्यासाठी महापालिकेने विविध करारनामे मराठीतून करावेत,अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.राज्य शासनाने वारंवार पत्रव्यवहार करूनही त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे करारनामे मराठीतून न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी देखील मागणी ब्रिगेडने निवेदनात केली आहे.

 

संभाजी ब्रिगेडचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे कार्याध्यक्ष विशाल मिठे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.आयुक्त शेखर सिंह आणि मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की महापालिकेच्या पर्यावरण माहिती व तंत्रज्ञान,आरोग्य,करसंकलन,विद्युत,स्थापत्य यांसारखे अनेक विभाग त्यांच्याकडील विविध संस्थांबरोबर केलेले करारनामे हे इंग्रजी भाषेमध्ये करतात स्थानिक स्वराज्य संस्थेने कोणतेही कामकाज मराठीमध्ये करणे बंधनकारक असताना अनेक विभागप्रमुख हे करारनामे इंग्रजी भाषेमध्ये करतात फक्त केंद्र सरकार,इतर राज्ये,भारतीय राजदूतावास,परराष्ट्रीय दूतावास,महालेखापाल,उच्च व सर्वोच्च न्यायालय यांच्याशी फक्त पत्रव्यवहार व कार्यालयीन कामकाज इंग्रजीमध्ये करण्यास अनुमती आहे. तसेच वैद्यकीय कागदपत्रे न्यायवैद्यक अहवाल या बाबी फक्त इंग्रजी भाषेमध्ये करण्यास अनुमती आहे.

राज्य शासनाने याबाबत अनेक कायदे केले परिपत्रके निर्गत केली तरीही पालिकेतील विभागप्रमुख करारनामे मराठी भाषेमध्ये करत नाहीत हे करारनामे मराठी भाषेमध्ये नसल्याने अनके नागरिकांना याचे आकलन होत नाही सदर करारनामे मराठी भाषेमध्ये केल्यावरच बहुसंख्य नागरिकांना त्याचे आकलन होईल नागरिकांचा प्रशासनात लोकसहभाग वाढेल तरी आपण सर्व विभागप्रमुखांना यापुढील सर्व करारनामे मराठी भाषेमध्ये करण्याचे तसेच आतापर्यंत केलेल्या इंग्रजी करारनाम्याचे मराठी अनुवाद करण्याचा आदेश द्यावेत तसेच जे विभागप्रमुख मराठी भाषेमध्ये करारनामे करणार नाहीत त्यांच्यावर महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणे (राजभाषा) अधिनियम-२०२२ मधील कलम १० नुसार शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here