शिर्डी (प्रतिनिधी संजय महाजन) : विद्या प्रसारिणी सभेच्या व्ही.पी.एस हायस्कूल व द.पू. मेहता कनिष्ठ महाविद्यालय व्हीपीएस प्राथमिक मराठी आणि इंग्रजी मीडियम विभाग यांच्या एकत्रित सहभागाने ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
७६ व्या प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहणाचा मान यावर्षी प्राचार्य उदय महिंद्रकर आणि ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत जोशी यांना मिळाला. कार्यक्रमानिमित्त भगवानभाऊ आंबेकर, राजेशजी मेहता, उदय महिंद्रकर आणि चंद्रकांत जोशी यांनी आपले मनोगत सादर केले. त्यांनी आपल्या मनोगता मधून देशसेवा, समाजसेवा आणि स्वच्छता राखण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त नियामक मंडळ अध्यक्षा डॉ. मृणालिनी गरवारे, कार्यवाह डॉ. सतीश गवळी, सहकार्यवाह श्री. विजयजी भुरके, नियामक मंडळ सदस्य अॅड. संदीप अगरवाल, शाळा समिती सदस्य श्री. धीरूभाई कल्याणजी यांनी शिक्षक, सेवक आणि विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती वैशाली तारू तर सूत्रसंचालन संजय पालवे यांनी केले. राष्ट्रगीत, राज्यगीत आणि झेंडागीत गायन संस्कृती विभाग प्रमुख धनंजय काळे आणि विद्यार्थ्यांनी सादर केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी धनंजय काळे, योगेश कोठावदे सांस्कृतिक विभाग, भीमराव राऊत, संजय राऊत, ज्ञानेश्वर बुरांडे शारीरिक शिक्षण विभाग, सर्व शिक्षक आणि सेवक वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमानिमित्त हायस्कूल, कनिष्ठ महाविद्यालय, मराठी प्राथमिक, इंग्रजी प्राथमिक विभाग आणि मॉन्टेसरी विभागातील सर्वच शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे सुंदर कार्यक्रम बसवले. त्यामध्ये शिवगर्जना, लाठी-काठी, मनोरे, स्काऊट गाईड बँड पथक, स्काऊट आणि गाईड परेड, देशभक्तीपर नृत्य, देशभक्तीपर गाणी, समूहगीत, विद्यार्थी मनोगत आणि लेझीम यांचा समावेश होता.
कार्यक्रमासाठी शाला समिती अध्यक्ष तथा नियामक मंडळ सदस्य भगवानभाऊ आंबेकर, शाळा समिती सदस्य राजेशजी मेहता, प्राचार्य उदय महिंद्रकर, उपप्राचार्य आदिनाथ दहिफळे, उपमुख्याध्यापक सुहास विसाळ, पर्यवेक्षक विजय रसाळ, श्रीनिवास गजेंद्रगडकर, प्राथमिक मराठी विभाग मुख्याध्यापिका मंगल जाधव, इंग्रजी प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका भारती लोखंडे, बीसीएस सीनियर कॉलेजचे प्राचार्य चंद्रशेखर भगत, व्हीपीएस इंग्लिश मॉन्टेसरीच्या मुख्याध्यापिका अन्नपूर्णा सूर्यवंशी, ज्येष्ठ शिक्षक चंद्रकांत जोशी, वरिष्ठ लिपिक कुंडलिक आंबेकर, शिक्षक प्रतिनिधी ज्योती डामसे, शिक्षकेतर प्रतिनिधी संजीवनी आंबेकर, संगणक विभागाच्या प्रमुख सविता सिंग उपस्थित होते.







