जळगांव (संपादक सुनिल पाटील) – येथील राष्ट्रीय हरित सेनेतर्फे पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियमितपणे वृक्षलागवडीचे कार्यक्रम घेण्यात येतात. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून हरित सेनेने शिवधाम मंदिर परिसरात वृक्षारोपण केले. याप्रसंगी हरित सेना सदस्य शक्ती महाजन , जिभाऊ वानखेडे अनिल अग्रवाल हरित सेना प्रमुख प्रविण हे उपस्थित होते.








