हॉटेल मुरलीमनोहरला लागली भीषण आग; नागरिकांच्या मदतीने टळला अनर्थ

हॉटेल मुरलीमनोहर

जळगाव (संपादक सुनिल पाटील) : शहरातील आकाशवाणी चौकाजवळील हॉटेल मुरली मनोहरच्या स्वयंपाकघराला अचानक आग लागली. ही घटना आज (दि.६) दुपारी घडली. आग लागण्याचे कारण अद्याप समजलेले नाही, मात्र या आगीमुळे हॉटेल मुरली मनोहर आणि त्यावर असलेल्या वेलनेस मेडिकल दुकानाचेही नुकसान झाले आहे.

 

आग लागल्याचे लक्षात येताच, परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर लगेचच जळगाव महानगरपालिकेचा अग्निशमन बंबही घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्याचे काम तात्काळ सुरू केले. त्याचबरोबर नागरिकांनी परिसरातील दुचाकी आणि इतर वाहने सुरक्षित ठिकाणी हलवल्यामुळे मोठे नुकसान झाले नाही.

 

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दल तात्काळ दाखल झाले. मात्र, अद्याप या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. आग लागण्याचे नेमके कारण काय होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here