पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) : तुमच्याकडे छोटे-छोटे काम आहेत ते करत नाय? काय करता रे, बसून तिथे? जास्त दिवस झालेत का? बदली करावी लागेल. शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना घेतले फैलावर.
सोलापूर माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप हे कार्यालयात उपस्थित नसतात. त्यामुळे शासनाने दिलेल्या टप्पा अनुदानावरील शिक्षकांचे २० टक्केचे शालार्थ प्रस्ताव पाठविणे, शालार्थ प्रस्ताव त्रुटीपूर्तता केल्यानंतर त्यावर सुनावणी ठेवणे, त्या सुनावणीचा निर्णय न देता शालार्थ प्रस्ताव उपसंचालक कार्यालयाकडे न पाठविणे, शिक्षकांची निवडश्रेणीची कामे प्रलंबित ठेवणे, अल्पसंख्यांक संस्थेतील शिक्षकांच्या ८०% प्रमाणे वैयक्तिक मान्यता न देणे, सुनावणीचे निर्णय न देणे, विनाअनुदानित वरून अनुदानित वर बदली केलेल्या शिक्षकांच्या शिफारशी शासनाकडे न पाठविणे यासारखी अनेक कामे प्रलंबित आहेत. तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी, संस्थाचालक, संघटना यांना अरेरावीची भाषा वापरतात अशी तक्रार प्रहार शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत ना गुलाबराव पाटील यांचेकडे भरलेल्या जनता दरबारात केली होती. त्यावर मंत्री महोदयांनी शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांना सुनावले की, तुमचे पगार बंद केले तर, तुम्हाला किती त्रास होईल आणि जरा शांततेत बोला मास्तरांशी. आपल्याला त्याच मास्तरांनी शिकवलेलं असतं.
सदर शिष्टमंडळात प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नागटिळक, जिल्हासचिव प्रताप दराडे, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश कल्याणी, जिल्हाउपाध्यक्ष बाबासाहेब कापसे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गिरीष गायकवाड-पाटील, सोमनाथ पवार, रमेश पवार, विजय मुसळे, विजय बुद्रुक, राजू अंबुरे, सुनिल कोळी, दत्तात्रय शेळके, सोमशेखर केशेट्टी, निलेश माने, उमेश गोसावी, कपील क्षिरसागर, सिद्धाराम पाटील, भगवान कदम, दिगंबर टेकाळे, गिरीष कडते, प्रदीप मसलकर, शांतीनाथ इंगोले आदी उपस्थित होते.







