साडेसात लाखांच्या १५ मोटारसायकलींसह अट्टल दुचाकीचोर एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात

जळगाव (उपसंपादक नंदुअप्पा पाटील) : चोरीची मोटर सायकल चालवणाऱ्या संशयित आरोपीला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले असता त्याच्याकडून मोटरसायकल चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ७ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या १५ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहे.

 

शहरात मोटरसायकल चोरीच्या वाढत्या घटना पाहता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी संदीप गावित यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबतच्या सूचना शहरातील पोलीस स्टेशनला दिल्या होत्या.

 

या कारवाईतंर्गत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी प्रदीप चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली की एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक व्यक्ती चोरीच्या मोटरसायकल घेऊन फिरत आहे. याबाबत वरिष्ठांना माहिती दिली असता पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, प्रदीप चौधरी विकास सातदिवे, रतन गीते, राहुल होते, योगेश बारी, योगेश घुगे यांनी संशयित आरोपीला मोटरसायकलसह ताब्यात घेतले.

 

संशयित आरोपी व्यक्ती नंदलाल भालेराव (वय २८, रा. वाघ नगर) याला ताब्यात घेऊन विचारणा केली असता सदरची मोटरसायकल ही बहिणाबाई महोत्सवातून चोरल्याचे त्याने कबूल केले. आरोपीला पोलीसकस्टडीमध्ये विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, त्याने त्याच्याजवळून जळगाव शहरातील जिल्हा पेठ, रामानंद नगर, एमआयडीसी, मोहाडी धुळे परिसरातून चोरलेल्या साडेसात लाख रुपये किंमतीच्या १५ मोटरसायकली काढून दिल्या. याप्रकरणी एमआयडीसीचे दोन, जिल्हा पेठचे तीन, रामानंद नगरचे तीन, धुळे मोहाडी पोलीस स्टेशनचा एक असे नऊ गुन्हे उघडकीस आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here