नाशिक (उपसंपादक इंजि. कुबेर जाधव) : सध्या रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी मुबलक प्रमाणात विजेची गरज आहे, या वर्षी पुरेशा पावसामुळे कांदा व इतर पिकांची लागवड वाढली आहे. मात्र भारनियमन आणि विजेच्या लपंडावामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.
सद्या विजेच्या भारनियमनामुळे शेतकरी आणि ग्राहक परेशान झाले आहेत, रब्बी हंगामातील कांदा पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी काबाडकष्ट करून पिकाला पाणी देण्यासाठी आटापिटा करत असतो,मात्र विजेच्या धरसोड पणामुळे शेतकऱ्यांना भविष्यात नविन पर्याय शोधावा लागतो,२ लाख रुपये किंमतीच्या प्रकल्पासाठी ७८ हजार रुपये अनुदान दिले जाते ( सबसिडी) त्यामुळे शेतकऱ्यांनी अपरममंपरागत उर्जेचा ज्यास्तीत ज्यास्त वापर करावा
– कुबेर जाधव,
समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना
केंद्र सरकारच्या सहकार्याने शेतकऱी व घरगुती ग्राहकांना अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत असलेल्या सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर करून *पंतप्रधान सुर्या घर योजना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे,त्या अनुषंगाने भउर येथील प्रगतिशील शेतकरी दिपक सुकदेव पवार यांनी स्थानिक महाराष्ट्र बँकच्या अर्थसहायाने अल्पशा व्याजदरात (७%) २ लाखात ३ की,व्हूट चा सुर्या सौर ऊर्जा प्रकल्पाअंतर्गत व्हिगार्ड कंपनीचे सोलर युनिट बसवण्यात आले. ३० वर्षं वांरंटी असलेले सोलर युनिट १० वर्ष वांरटी असलेले इन्व्हर्टर ही कंपनीकडून देण्यात येते,या प्रसंगी महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक नितीन पाडवी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांच्या हस्ते पुजन करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रगतीशील शेतकरी सुकदेव पवार, उषा फर्टीलायझर चे संचालक दीपक पवार ,प्रतिक आहीरे, सोसायटी चेअरमण दीपक पवार, शेतकरी संघाचे संचालक काशिनाथ पवार,व्हि गार्ड कंपनीचे डिलर सतिश बछ्चाव,आदी उपस्थित होते ,ज्यास्तीत ज्यास्त शेतकरी आणि ग्राहकांनी पंतप्रधान सुर्या सौर ऊर्जा प्रकल्पाअंतर्गत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक नितीन पाडवी यांनी केले आहे.







