दोंडाईचा (संतोष कोळी) – महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना जिल्हा शाखा नाशिक वतीने.आज दिनांक १७l०८l२०२० रोजी महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या वतीने राज्यसरचिटणीस राजेंद्रजी म्हसदे यांच्या मार्गदर्शनाने तथा हस्ते नाशिक जिल्ह्याचे नूतन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजीवजी पंडितराव म्हसकर यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षणाधिकारी म्हसकर यांनी संघटनेच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले की, लवकरात लवकर जिल्ह्यातील शिक्षक,मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांच्या समस्या तसेच ऑनलाईन शिक्षणाबाबतची जनजागृती इ. तथा इतर सर्व प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष वेळ देन्याचे मान्य केल आणि थोडक्यात चर्चा करण्यात आली.
यावेळी, राज्य नेते ,राज्यसरचिटणीस राजेंद्रजी म्हसदे यांचे हस्ते शाल तसेच फिल्म निर्माता निलेशजी आंबेडकर यांचे हस्ते पुष्पगुच्छ देण्यात आला. समवेत जिल्हाध्यक्ष राहुलजी सोनवणे, जिल्हा कोषाध्यक्ष कैलासजी बोढारे, जिल्हा सल्लागार आनिलजी बागुल, सुभाषजी लोहकरे, सुधाकरजी अहिरे, राजेशजी बावनगडे, अनिलजी जाधव, सिध्दार्थ सपकाळे उपस्थित होते.







