मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरूण चव्हाण) – केंद्र शासनाच्या माध्यमातून १५ ऑगस्ट २०२० पासून नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. देशातील २७२ जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यातील मुंबई शहर व मुंबई उपनगर दोन्ही जिल्ह्यात नशामुक्त भारत हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ दिनांक १५ ऑगस्ट २०२० रोजी स्वतंत्र दिनी पार पडला. हे अभियान जिल्हाधिकारी मुंबई शहर व मुंबई उपनगर यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आला. सामाजिक न्याय विभागाच्या सहयोगाने या अभियानाचा प्रारंभ मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या हस्ते या अभियानाचा नशामुक्त मुंबईच्या लोगोचे विमोचन करण्यात आले. शनिवारी सकाळी ११ वाजता ते १२ वाजून १५ मिनिट या कालावधीत अॉनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. गायिका ज्योती चव्हाण यांच्या नशामुक्तीपर गिताने कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. मान्यवराच्या परिचया नंतर मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते लोगोचे विमोचन केले गेले. यावेळी गंधार जाधव निर्मित ‘से नो टू ड्रग्स’ या गिताचे सादरीकरण करण्यात आले. सिने अभिनेते शंशाक केतकर, सिध्दार्थ जाधव व क्रिकेट पट्टू अजिंक्य रहाणे यांनी नशामुक्तपर लाईव्ह संदेश दिले. या अभियानाची भूमिका व महत्त्व आणि कृतिशील १३ विषयांवरील कृती कार्यक्रमाची माहिती जिल्हाधिकारी राजीव निवकर यांनी सविस्तर माहिती दिली व या अभियानाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.
व्यसनमुक्ती ही काळाची गरज या विषयी डॉ. सारीका दक्षीकर सहयोगी प्राध्यापक व पथक प्रमुख व्यसनमुक्ती केंद्र, गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई यांनी आपले प्रबोधन केले. या अभियानाचे नियोजन व सहा संकल्पना याची माहिती समाधान इंगळे, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण मुंबई व उपनगर यांनी दिली.
एकंदरीत नशामुक्त अभियानाचे स्वरूप व अमलबजावणी कशा पध्दतीने असणार आहे. यामध्ये प्रत्येक महिन्यात २० कार्यक्रम मुंबई जिल्ह्यात राबविण्यात येणार आहेत. विविध सण, उत्सव, महापुरुषांच्या जयंती / स्मृती दिनी व व्हेलेंटाईन डे या दिनानिमित्ताने अनेक उपक्रम आयोजित करुन हे अभियान प्रभावी पणे राबवून व्यसनमुक्त मुंबई, सक्षम मुंबई करण्याचा मनोदय अमोल स.भा.मडामे चिटणीस / मुख्य संघटक नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी व्यक्त केली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मुंबई उपनगर, निलिमा धायकडे यांनी अॉनलाईन व्यसनमुक्तीची शपथ सहभागी २००० प्रेक्षकांना दिली. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन वर्षा विद्या विलास, सरचिटणीस नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रांजल कोठावदे, समन्वयक महाराष्ट्र प्रकल्प देखरेख युनिट, सामाजिक न्याय विभाग भारत सरकार यांनी केले.






