पंढरपूर (तालुका प्रतिनिधी प्रकाश इंगोले) : सोनार समाज दैवत श्री संत नरहरीमहाराज सोनार हे सदेह पांडुरंगात विलीन झाल्याने त्यांची पुण्यतिथी न करता हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळा साजरा करण्याचा संदेश देण्यासाठी श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर धर्माचार्य श्री दत्तात्रय महाराज दहिवाळ दत्त दिगंबर पीठ लाडगाव संस्थान हे शनिवार दि १५ फेब्रुवारीस पंढरीत येत आसल्याची माहीती भारतीय नरहरी सेना प्रणीत सराफ सुवर्णकार संरक्षण समीतीचे प्रदेशाध्यक्ष उमेशभाऊ बुऱ्हाडे व अॅड विशालजी वेदपाठक यांनी प्रसार माध्यमांना दिली.
शके १११५ ते १२०७ या कालावधीत श्री संत नरहरीमहाराज सोनार हे निस्सीम कट्टर शिवभक्त होऊन गेले संत मांदियाळीत त्यांचे स्थान अग्रभागी आहे. आशा या महान संताला शके १२०७ ला पांडुरंगाने स्वताच्या कटीत सामावून घेतले आशा संताची पुण्यतिथी केली जाते त्याला तिलांजली देत हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळा साजरा केला जाणार आहे.
श्री संत नरहरीमहाराज सोनार हे पांडुरंगात विलीन झाल्याने त्यांची पुण्यतिथी न करता दि १५ फेब्रुवारीला श्री विठ्ठलाची तुळशी पुजा धर्माचार्याच्या हस्ते करून संत नरहरींचा जयघोष करत हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळा साजरा होणार आहे या सोहळ्या साठी महाराष्ट्र तुन सर्व शाखीय सोनार समाज व नरहरीभक्त पंढरीत एकवटनार आहेत.
या हरीऐक्य सायुज्य समाधी सोहळ्यासाठी डॉ राजेद्रजी पिंगळे, अर्चनाताई दिंडोरकर, उमाकांतशेठ मंडलिक, राजेशजी टाक.सारीकाताई नागरे, मोहनशेठ पोतदार, लंकेशजी बुराडे, रविशेठ माळवे, सनीशेठ सोनार, सुनिल अहिरराव आदी सोनार समाज बांधव परीश्रम घेत आहेत.







