धनंजय मुंडेंना जाऊ द्या ना घरी!

धनंजय मुंडें

नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) : आरोप सिद्ध होईपर्यंत राजिणामा घेणार नाही हे अजितदादांचं विधान अत्यंत अनैतिक आहे. असे सर्वच समाज माध्यमांना आता वाटायला लागलं आहे, एका मागुन एक दणका बसत असतानाही राजीनामा दिला जात नाही, अथवा घेतला जात नाही, याला काय म्हणावे? देवेंद्र फडणवीस यांच्या समोर धंनजय मुंडे यांना घरचा रस्ता (आ हेर ) दाखवल्या शिवाय पर्याय नसल्याचे एकंदरीत चालु घडामोडींवरुन दिसत आहे.

रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून लाल बहादूर शास्त्रींनी तडकाफडकी राजीनामा दिला होता,.त्यांचं नाव पण घेण्याची लायकी आजच्या राजकीय धेंडामध्ये नाही,पण या महाराष्ट्रातील राजकारणातही नैतिकतेच्या कारणास्तव राजिणामा देण्याऱ्यांची काय कमी उदाहरणं आहेत*?

बॅ. अब्दुल रहेमान अंतुले (मुख्यमंत्री) यांच्यावर सिमेंट घोटाळ्याचा आरोप झाल्याबरोबर त्यांनी राजीनामा दिला होता त्यांचा गुन्हा सिद्ध झाला होता का?* बॅ. रामराव आदिकांवर (उपमुख्यमंत्री) एअर होस्टेसची छेडछानी केल्याचा आरोप झाला असता त्यांनी राजीनामा दिला तेव्हा कुठे गुन्हा सिद्ध झाला होता का? शिवाजीराव पाटील निलंगेकर (मुख्यमंत्री) यांच्यावर मुलीचे गुण परिक्षेत वाढवल्याचा नुसता आरोप झाला तरी, त्यांनी थेट मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.तेव्हा काय गुन्हा सिद्ध झाला होता का? मनोहर जोशी (मुख्यमंत्री) यांच्या जावयाचं बांधकाम प्रकरण उजेडात आलं,आसता त्यांनी राजीनामा दिला होता यावेळी त्यांचा गुन्हा सिद्ध झाला होता का? अगदी अलिकडेच अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना यांच्यावर आदर्शमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झाला. त्यांनी लगेच राजीनामा दिला. त्यांचा गुन्हा सिद्ध झाला होता का? बबनराव घोलप, महादेव शिवणकर, शशिकांत सुतार, सुरेशदादा जैन यांनी आरोप झाल्यावर मंत्रीपदाचे राजीनामे दिले. त्यांचे गुन्हे सिद्ध झाले होते का? कधी?

तेलगी प्रकरणी आरोप झाल्यावर भुजबळांनाही राजीनामा द्यावा लागला होता. त्यांचा गुन्हा सिद्ध झाला होता का. अगदी अलीकडे् सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यावर प्रितीसंगमावर आत्मक्लेश करत स्वतः अजित पवारांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिला होता. तेव्हा गुन्हा सिद्ध झाला असं दादांना मनोमन वाटलं होतं का?

या राज्यात एक आरोपी इतका मोठा डाॅन होतो की पोलीस हात लावू शकत नाहीत, तो सरेंडर होऊन उपकार करतो. त्याचे मंत्र्यांशी आणि पोलिस यंत्रणेशी थेट आर्थिक संबंध आणि व्यावसायिक संबंध उघडउघड दिसतात, त्याची सर्वांशी जवळीक खालील फोटोतून जनतेला दिसते तरी गुन्हा सिद्ध होईपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार नाही असं दादा म्हणतात? वा रे नैतिकता आणि वा रे लोकशाही!

नैतिक आधारावर राजीनामा हे तुमचे जनतेवर उपकार नसतात. एखाद्याचे लागेबांधे जगजाहीर झाल्यावर चौकशी यंत्रणा आणि न्याय यंत्रणेवर बलाढ्य मंत्री दबाव आणू शकतो आणि त्यातून पिडीताला न्याय मिळत नाही म्हणून राजीनामा घ्यायचा असतो. बाहुबलीच्या भुजेतलं राजकीय बळ काढल्याशिवाय सामना बरोबरीचा होणार नाही आणि न्यायही मिळणार नाही म्हणून राजीनामा घ्यायचा असतो. अर्थात दादा, फडणवीस, शिंदे, मुंडे यांनी आता नैतिकतेच्या व्याख्याच बदलल्या असतील तर तो त्यांचा दोष नाही. त्यांना प्रचंड बहुमत देणाऱ्या मतदारांचा आहे असं मला वाटतंय.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here