नाशिक (उपसंपादक इंजि कुबेर जाधव) | देवळा तालुक्यातील श्री रामेश्वर कृषी मार्केट महात्मा फुलेनगर( उमराणे ) या खाजगी मार्केटला दोन वर्षांपूर्वी देण्यात आलेला कांद्याच्या बिलाची ३ कोटी १२ लाख ८२ हजार रुपये ,३०२ कांदा उत्पादक शेतकऱ्यांची थकित रक्कम खाजगी बाजार समितीतील व्यापारी हर्षद टेड्रर्स या व्यापाऱ्याने अनेक वेळा तगादा लावूनही अदा केलेली नाही,परवाना रद्द करण्यात आल्याचा आदेश राज्याचे पणन संचालक शरद जरे यांनी गुरुवार ( दि .३०) रोजी दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. यामुळे या खाजगी बाजारात शेतमालाच्या खरेदीविक्रीचे व्यवहार बंद पडणार आहेत.
मागील वर्षी जून २०२५ मध्ये पणनच्या सहसंचालक स्नेहा जोशी यांनी या मार्केटला भेट देत सविस्तर तपासणी केली होती. त्यात खरेदीदार (व्यापारी) करीत असलेल्या व्यवहारांवर खाजगी बाजाराचे प्रभावी नियंत्रण नसल्याचे दिसून आले होते. शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या शेतमालाचे चुकारे रोजच्या रोज होत आहे किंवा कसे याबाबत खाजगी बाजार परवानाधारक हे अनभिज्ञ असल्याचेही दिसून आले. काही व्यापारी यांची शेतमाल खरेदी व शेतकऱ्यांना रकमा अदा केल्याबाबतचे दप्तर मिळाले नाही. याशिवाय तपासणी सुरु असताना या खाजगी बाजारामध्ये हर्षद ट्रेडर्स विरोधात घोषणाबाजी झाली असल्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांशी संवाद साधून याबाबत अर्ज करण्याचे आवाहन केले असता ३८ अर्ज प्राप्त झाले होते. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे पैसे परवान्याच्या अटी व शर्तीनुसार विहित मुदतीत अदा न करणे ही अत्यंत गंभीर बाब या तपासणीत नमूद करण्यात आले होते. तसेच या दरम्यान झालेल्या ११ सुनावण्यांना परवानाधारक बाजार समितीच्या प्रतिनिधी तर्फे अनुकुल प्रतिसाद न देता उलट अडथळा निर्माण केल्याचे स्पष्ट झाल्याचा ठपका गंभीर ठेवण्यात आला आहे.
तपासणी अधिकारी यांनी दिलेल्या अहवालात सुनावणी दरम्यान उपलब्द कागदपत्रे, संबंधित शेतकऱ्यांनी सादर केलेली लेखी-तोंडी निवेदने, विक्री पावत्या शेतकऱ्यांच्या थकीत देयकांच्या वसुलीसाठी प्रभावी कार्यवाही नाही, त्यासंदर्भात तसे अभिलेखेही उपलब्द नाहीत, व्यापाऱ्यांच्या व्यवहारांवर आवश्यक ते पर्यवेक्षण व नियंत्रण, नाही असा निष्कर्ष सादर करण्यात आला. यावरून या खाजगी बाजार परवानाधारकाने त्यांच्यावर असलेल्या वैधानिक जबाबदाऱ्यांचे पालन करण्यात गंभीर कसूर केली असून यामुळे शेतकऱ्यांच्या हितावर प्रतिकूल परिणाम झालेला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या विस्वासावर, कांदा विक्रीसाठी आणला होता,त्या विस्वासाला तडा गेला आहे,यावर श्रीरामेश्वर कृषी मार्केट महात्मा फुलेनगर या खाजगी मार्केटला देण्यात आलेला खाजगी बाजार परवाना रद्द करण्यात आल्याचा आदेश देण्यात पणन संचालक श्री जरे यांनी दिला आहे. यामुळे दीलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर या खाजगी बाजारात शेतमालाच्या खरेदीविक्रीचे व्यवहार करता येणार नाहीत आणि तसे केल्यास कारवाई करण्यात येईल असा आदेश देण्यात आला आहे. यासंदर्भात या खाजगी बाजार समितीच्या संचालक मंडळाशी संपर्क साधण्याचा प्रयन्त केला असता तो होऊ शकला नाही, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचे थकित रक्कमा कशा पद्धतीने अदा केल्या जातील,या कडे संपूर्ण कसमादे मधिल उत्तपादक शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे, दरम्यान श्री रामेश्वर खाजगी बाजार समितीत होणारी दैनंदिन कांद्याची आवक ,व मिळत असलेला उचित दर याला ब्रेक लागला आहे,पणन मंत्री जयकुमार रावल आणि सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी यांनी या संदर्भात लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, तसेच शेतकऱ्यांनी ही पाच पन्नास रुपये ज्यास्तीची पावती घेऊन उधारीवर न देता आपल्या कष्टाचा कांदा व्यापाराच्या अमिषाला बळी न पडता रोखीने २४ तासाच्या आत पेमेंट पदरात पाडून घ्यावे, मार्केटवर अवलंबून असणारे अनेक कर्मचारी व मजूरवर्ग यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. येथील परिसरातील छोटेमोठे व्यवसाय मागे पडतील. शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयीस्कर असलेले मार्केट बंद पडल्याने अडचणी वाढणार आहेत म्हणून शासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांचे थकित पेमेंट अदा व्हावे यासाठी पुढाकार घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव यांनी केली आहे,







