देवळा बाजार समितीच्या २२ वी सर्व साधारण सभा शांततेत

देवळा बाजार समिती

नाशिक (उपसंपादक इंजि.कुबेर जाधव) | देवळा बाजार समितीच्या कार्यालयातील सभागृहात आयोजित सर्व साधारण सभा बाजार समिती सभापती सौ धनश्री ताई केदा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत पार पडली, या विविध विषयावरील ठरावांना मंजुरीही देण्यात आली, यावेळी बाजार समितीचे माजी सभापती केदा नाना आहेर यांनी बाजार समितीच्या कामकाजाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांच्या हितासाठी असलेल्या बाजार समितीचे कामकाज सुरळीत आणि सुस्थितीत चालू असल्याचे आवर्जून सांगितले.

येत्या काळात बाजार समितीच्या आवारात विविध विकास कामांचा आढावा घेऊन, सुमारे आठ कोटी रुपयांचा विकास आराखड्याला प्रशासकीय मंजुरी घेऊन प्रलंबित असलेली कामे केली जाणार असल्याचे त्यांनी संचालक मंडळाचा हवाला देऊन सांगितले, तसेच देवळा बाजार समितीच्या आवारात कै शरद जोशी यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची उभारणी करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक कुबेर जाधव यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे,
त्यांनी केलेल्या मागणीचा १०० % सकारात्मक विचार करुन कै शरद जोशी यांचे स्मारक उभारण्यात साठी प्रस्ताव सादर करण्यात येणार येईल व तो प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, यांच्या मार्फत पणन संचालक यांच्या कडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल असे आश्वासन संचालक मंडळाच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आवर्जून सांगितले.
यावेळी सभापती सौ धनश्री ताई आहेर यांनी कामकाज करीत असताना येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा करून सामंजस्याने निर्णय घेतला जातो, पिण्याच्या पाण्याची योग्य ती उपाययोजना केली जाईल असे दिपक पवार यांच्या प्रक्ष्नावर उत्तर देताना सांगितले, मार्केट फी व शेतकऱ्यांच्या पेंमट संदर्भात येणाऱ्या अडचणी बाबत कांदा उत्पादक शेतकरी,व व्यापारी यांच्या समन्वयाने कामकाज सुरळीत चालू राहण्यासाठी दोन, तिन , शेतकरी समन्वयक नेमण्याची सूचना ही मा सभापती योगेश आहेर, आणि कुबेर जाधव यांनी केली, यावेळी संस्थेचे संचालक,उप सभापती, सचिव तैदेवळा तालुक्यातील शेतकऱ्यांची विशेष उपस्थिती होती, शेवटी बाजार समितीचे माजी सभापती य़ोगेश आहेर यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here