जळगाव (संपादक सुनिल पाटील) : २०२५ ते २०३० या कालावधीसाठी होऊ घातलेल्या जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशन आणि जळगाव जिल्हा सहकारी बोर्ड या संस्थांच्या सुरू असलेल्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या जेडीसीसी बँक अध्यक्ष संजय पवार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज असल्याकारणाने दोन्ही संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन संजय पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे.
जळगाव जिल्हा सहकार बोर्ड ही अनेक वर्षापासून ची संस्था आहे सदर संस्थेचे कामकाज म्हणजे जळगाव जिल्ह्यातील सहकार संस्थांना मार्गदर्शन करणे विविध कार्यकारी सोसायटी मध्ये कार्यरत असलेले गटसचिव यांना प्रशिक्षण देणे हे काम सहकार बोर्डामध्ये पूर्वीपासून केले जात आहे. तसेच या संस्थेमध्ये जळगाव जिल्ह्यातील मान्यवर जेष्ठ पदाधिकाऱ्यांचा सहभाग असायचा तसेच जळगाव जिल्हा सहकारी कॉटन मार्केटिंग फेडरेशन या संस्थेला देखील मोठा इतिहास आहे.
दोन्ही संस्थांच्या संचालकपदी संजय पवार यांचा सहकार क्षेत्रामधील कामाचा अनुभव लक्षात घेता बिनविरोध निवड झालेली आहे. जळगाव जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामध्ये जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जळगाव जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघ, जळगाव जिल्हा सहकार बोर्ड, जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, जळगाव जिल्हा पीक संरक्षण फेडरेशन, जळगाव जिल्हा देखरेख सहकारी संघ, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन अशा विविध अनेक शेतकरी संस्थांमध्ये संजय पवार काम करत आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.







