वराड बुद्रूक येथे ट्रकच्या धडकेत टूव्हीलरचालकाचा मृत्यू

वराड अपघात

धरणगाव (प्रतिनिधी विनोद पाटील) : धरणगाव तालुक्यातील वराड बुद्रुक येथील बस स्टॉप समोरील कॉर्नरवर अशोक लेलॅण्ड (नंबर एमएच ०४ जी आर ९९९९) ने टूव्हीलरला (क्रमांक एमएच १९ डीक्यू ३७२६) धडक दिल्याने विनोद वसंत कोळी (वय ४७, रा.जवखेडा, ता.एरंडोल) या टु व्हीलर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

वराड बुद्रुक बस स्टॉप समोरच्या कॉर्नवर नेहमीच अपघात घडत असतात म्हणून वराड खुर्द व बुद्रुकच्या संतप्त गावकऱ्यांनी रस्तारोको करुन या कॉर्नवर गतिरोधक टाकण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here