धरणगांव (प्रा.पी.म.पाटील) – येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौधरी यांच्या दुर्लक्ष मुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून कोविड व्यतिरिक्त रुग्णाचे हाल होत आहेत.याला जबाबदार असणाऱ्याना डॉ. गिरीश चौधरी यांची बदली न करता त्यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे अशी मागणी माजी.नगराध्यक्ष तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख पी. एम.पाटील.सर यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
त्यांनी या निवेदनात म्हटले आहे की, ओ.पी.डी सकाळी ९ते१ व सायंकाळी ४ते६ अशावेळेत सुरू ठेवण्याची असून वेळेवर डॉ.हजर राहत नसल्यामुळे रुग्णाचे हाल होतात धरणगांव तालुक्यात ७०ते८० खेडे लागून असल्यामुळे ग्रामीण व शहरातील जे गरीब रुग्ण आहेत फार मोठ्या आशेने उपचारासाठी येतात परंतु तासन तास त्यांना डॉक्टरांची प्रतीक्षा करावी लागते वास्तविक पाहता आजार हा काही टाईम टेबल पाहून येत नाही किंवा अपघात काही सांगून होत नाही.त्यामुळे डॉक्टर हा २४ तास निवासी असणे बंधन कारक आहे.परंतु डॉ.गिरीश चौधरी हे जळगांव निवासी आहेत याचा विचार करावा ते केव्हा येत असतील आणि केव्हा जात असतील.
धरणगांव शहरात सर्वांनाच माहीत आहे डॉक्टर वेळेवर उपस्थित नसल्यामुळे अनेक गरोदर महिला, जेष्ठ नागरिक, अपंग,निराधार यांच्यावर अनेक वेळा कसे प्रसंग आले आहेत, ग्रामीण रुग्णलयाची पी.एम. रूमची काय परिस्थिती आहे. एखाद्या अधिकाराने बिना तोंडाला रुमाल बांधून जर पी.एम. रूम पहिला तर मी राजकीय संन्यास घेईल मागच्या काळात काही दिवसांपूर्वी पी.एम झाला काय अवस्था झाली ती नेहमी संपर्कात असणाऱ्याना माहिती आहे जनतेला त्याची कल्पना नसेल परंतु आजही त्या ठिकाणी खराब अंगावरच्या कपड्यांचा ढीग पडलेल्या आहे .परिसर अतिशय अस्वच्छ आहे. संडासची टाकी जसे त्यात वृक्षरोपन केले आहे की काय एवढे झाडे वाढली आहेत इतरत्र इतकी दुर्गंधी व घाण आहे त्याचे कालच काढलेले सर्व फोटो सुद्धा जनतेच्या व पालकमंत्र्यांच्या, नगराध्यक्षाच्या व अधिकाऱ्यांच्या माहिती साठी पुराव्या निशी टाकत आहे.
पालकमंत्र्यांनी उपजिल्हा रुग्णालयाबाबत कागदपत्रांची पुर्तता करण्याचे आदेश दिले असतांना सुद्धा डॉक्टरांनी काय पाठपुरावा केला .या आधी अनेक राजकीय पक्षांनी ग्रामीण रुग्णालय धरणगांव बाबत अनेक घटना घडल्यानंतर जिल्हा वैद्यकीय अधिकारी, आरोग्यमंत्री यांच्या कडे तक्रारी केल्या आहेत परंतु आपले काही होत नाही झाली तर बदली होते असा डॉक्टरांचा समज असतो.
नुकतेच जळगांव सिव्हिलचे वृत्त सर्वांनी वाचले असेल एक कोविड रुग्ण आजी संडास मध्ये मृत अवस्थेत सापडली किती काळजी डॉक्टर घेतात हे त्यावरून कळते. अधिकारी चूक करतात,हलगर्जीपणा करतात आणि नाव यात बदनाम होते लोकप्रतीनिधी पालकमंत्र्याचे. तशीच परिस्थितीत धरणगांव ग्रामीणची आहे सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी वारंवार तक्रारी करत असतात तोंडी सूचना देत असतात परंतु ह्या कानाने ऐकायचे आणि त्या कानाने सोडुन दयायचे.
आतातर कोवीड सारख्या भयानक विषानूच्या बहाना त्यांना सापडला आहे त्यामुळे इतर रुग्णाची काय परिस्थिती होते त्यामुळे त्यांना बोलणार कोण. अश्या ह्या डॉ.गिरीश चौधरीच्या हलगर्जीपणा मूळे एखादया रुग्णाच्या बाबतीत काही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार वैद्यकीय अधिकारी डॉ.गिरीश चौधरीच राहतील जास्तीचा स्टॉफ देऊनसुद्धा जनतेचे हाल होणार नाहीत, याची खात्री नाही. हे लेखी स्वरूपाचे निवेदन माजी.नगराध्यक्ष तथा शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी.एम. पाटील.सर यांनी ना.पालकमंत्री गुलाबरावजी पाटील,जिल्हा रुग्णालय व आरोग्य मंत्री यांना दिले आहे






