भारतीय वंशाच्या शीख महिलेने रचला अमेरिकेत इतिहास

न्यूयॉर्क – वेस्ट पॉईंट अमेरिकन सैन्य अकादमीतून सेकंड लेफ्टनंट अनमोल नारंग ही पदवी मिळविणारी पहिली शीख महिला बनून त्यांनी इतिहास रचला आहे. नारंग यांचा जन्म अमेरिकेत झाला असला तरी संगोपन जॉर्जियामधील रोजवेल येथे झाले. त्यांनी जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी संपादन केली आणि त्यानंतर अण्वस्त्र अभियांत्रिकी विषयात पदवी घेतली. तब्बल 218 वर्षांनंतर अमेरिकन सैन्य अकादमीतून पदवीधर होणारी ती पहिली महिला ठरली आहे.
न्यूयॉर्कमधील शीख कोलिशन’ एनजीओने यांची माहिती दिली. नारंग यांनी म्हटले आहे की, वेस्ट पॉईंटमधून पदवीधर होण्याचे माझे स्वप्न पूर्ण होणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. एका अधिकार्‍याने सांगितले की, नारंग ओक्लाहोमा येथे बेसिक ऑफिसर लीडरशिपचा अभ्यासक्रम पूर्ण करेल आणि त्यानंतर जानेवारीत जपानच्या ओकिनावा येथे पहिल्या नियुक्तीवर जातील. अमेरिकन सैन्याच्या इतिहासात तब्बल 218 वर्षांनंतर अमेरिकन नसलेल्या महिलेला इतके मोठे पद मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here