मुंबई : कोरोनामुळे २०२१ मध्ये होणारा ऑस्कर सोहळा दोन महिने पुढे ढकलण्यात आले आहे. फेब्रुवारीमध्ये होणारा हा सोहळा आता एप्रिलमध्ये होणार आहे. २५ एप्रिल २०२१ रोजी ऑस्कर सोहळा आयोजित केला जाणार आहे. १५ मार्चला नामांकने घोषित होणार असून २८ फेब्रुवारीपर्यंत ऑस्करसाठी एन्ट्री घेतल्या जाणार आहेत.
ब्रिटिश ॲकॅडमी ऑफ फिल्म ॲण्ड टेलिव्हिजन आर्ट्स (BAFTA) नेदेखील फिल्म ॲवॉर्ड्सची तारीख १४ फेब्रुवारी बदलून 11 एप्रिल करण्याची घोषणा केली होती. मार्चच्या मध्यापासून संपूर्ण जगभरातील सिनेमागृहे बंद आहेत. चित्रपटांचे प्रोडक्शन थांबले आहे. सोशल डिस्टन्सिंग आणि अनेक गाईडलाईन्स लागू करून मागील आठवड्यात लॉस एंजेलिसमध्ये हॉलिवूड चित्रपटांना शूटिंगसाठी परवानगी देण्यात आली आहे.
९३ वर्षांच्या इतिहासात ॲकॅडमी ॲवॉर्ड्सच्या तारखेत चार वेळा बदल झाला आहे. याआधी १९३८ मध्ये लॉस एंजेलिसमधील पुरामुळे तारीख बदलण्यात आली होती. याशिवाय, १९६८ मध्ये लोकांच्या हक्कासाठी लढणारे नेते मार्टिन किंग ज्युनियर यांच्या हत्येनंतर आणि १९८१ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रोनाल्ड रीगन यांच्या हत्येनंतर पुरस्काराची तारीख बदलण्यात आली होती.






