मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : बहुचर्चित छावा चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या चित्रपटाने रिलीज आधीच ॲडव्हान्स बुकिंगमध्ये बंपर कमाई करत आहे. विकी कौशल आणि रश्मिका मंदाना चित्रपटाचे जबरदस्त प्रमोशन देखील करत आहेत.
एकीकडे चित्रपटासाठी उत्सुक असताना दुसरीकडे सेन्सॉर बोर्डने चित्रपटासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. सेन्सॉर बोर्डने चित्रपटातील काही संवादांवर कात्री फिरवली आहे. हे आवश्यक बदल केल्यानंतर चित्रपट प्रदर्शत होणार आहे. तसेच आक्षेपार्ह शब्द (हरामजादा) म्यूट करण्यात आले आहेत. तसेच वयाशी संबंधित काही बदल करण्यात आले आहे.
सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला डिस्क्लेमर देण्यास सांगितले आहे. तो डिस्क्लेमर असा की, “हा चित्रपट कादंबरीवरून घेतलाय” यामुळे इतिहास जपला जाणार आहे.’छावा’ चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने कडून U/A प्रमाणपत्र दिले आहे. सेन्सॉर बोर्डाने सांगितलेल्या बदलानंतर ‘छावा’ चित्रपट २ तास ४१ मिनिटे ५० सेकंदाचा झाला आहे.







