ठाणे (प्रतिनिधी लक्ष्मीनारायण वनम) : येथे महिला प्रवाशाच्या लोकल डब्यात मोबाईलचा स्फोट झाला. १० फेब्रुवारीला रात्री ८:१२ वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण जंक्शनपर्यंत लोकल ट्रेन जात होती. दरम्यान कळवा रेल्वे स्थानकावर महिलांच्या लोकल रेल्वे डब्यात एका अज्ञात महिलेचा मोबाईल फोन ब्लास्ट झाला होता. घटनास्थळी रेल्वे पोलीस कर्मचारी तातडीने दाखल होत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. नंतर गाडी पुन्हा कल्याणला रवाना झाली.
सीएसएमटी रेल्वे नियंत्रण कक्षाच्या अहवालानुसार, ‘सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मोबाईल फोनचा ब्लास्ट झाल्यामुळं काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. स्फोटामुळे महिला रेल्वे डब्यात धूर पसरला होता. धूर पाहताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. तसेच अग्रिशामक यंत्राचा वापर करून त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.
आग विझवण्यात आल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात रेल्वे पोलीस कर्माचाऱ्यांना यश मिळाले. नंतर गाडी पुन्हा कल्याणला रवाना झाली. या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. मात्र, या घटनेनंतर रेल्वे डब्यात भीतीचं वातावरण पसरलं होतं.







