दोंडाईचा (संतोष कोळी) – धुळे जिल्हा येथील सोलापूर जिल्हा प्रतिनिधी संतोष कोळी यांच्याकडून 913 रोजी जिल्हा परिषद आदर्श सरपंच पुरस्कार विजेते मुळशी चे तत्कालीन सरपंच तसेच सरपंच महापरिषदचे संस्थापक, अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्यातील 28 हजार 500 सरपंचांना एकत्रीत करुन स्थापन केलेल्या महाराष्ट्र स़रपंच सेवा महा संघाचे विदयमान सल्लागार हणुमंतजी सुर्वे यांची बेरोजगार, भुमिहीन मजुर व असंघटित कामगार संघ [ भारत ] या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी निवड झाले बद्दल मनापासून हार्दिक अभिनंदन केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गावातील सरपंचांशी डायरेक्ट संपर्कात राहुन आपल्या गावातील समस्या शासन दरबारी मांडुन सोडवणूक करणार्या नेतृत्वास बेरोजगार, भुमिहीन मजुर व असंघटित कामगार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश संघटक पदी निवड म्हणजे राज्यातील दिन दुबळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाची जान असणाऱ्या नेतृत्वाला जनसेवेची योग्य संधी मिळाली असून, जनतेच्या या प्रभावी नेतृत्वाला नेतृत्वाला जनहितार्थ काम करणेसाठी व पुढील सामाजिक वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या आहेत.








