त्या अल्पसंख्याक शेतकऱ्यांना अद्यापही गुरे मिळाली नाही- बाफना विरुद्ध शेतकऱ्यांची व समाज सेवकांची तक्रार

जिल्हा दंडाधिकाऱ्यांचेसुद्धा पोलीस अधीक्षकांना आदेश

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – २५ जुलै रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशन मेहरुण परिसरातील १४१ जनावरे- गुरे जप्त केली होती व व त्या गुरांची व शेतकऱ्यांची शहानिशा करून कागदपत्रे बघून त्यातील आठ शेतकऱ्यांची ८२ गुरे ही पारंपारिक शेती व्यवसायाशी संबंधित असल्याने ती त्वरित सोडण्याचे आदेश एमआयडीसी पो स्टे चे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी आर सी बाफना गोशाळा कुसुंबा यांना दिले होते परंतु पोलीस निरीक्षकांचे आदेशाची पायमल्ली करून सुद्धा त्यांनी अल्पसंख्यांक शेतकऱ्यांची जनावरे दिली नाही.
जिल्हा दंड अधिकाऱ्याचे आदेश
जिल्हादंडाधिकारी यांना शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रत्यक्ष भेटून सर्व कागदपत्र दाखवले असता जिल्हादंडाधिकारी यांनीसुद्धा त्यांचे पत्र क्रमांक दंडप्र /कावी/२०/२/ ७९/ ३२७ दिनांक ७ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या गुरां बाबत तसेच एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या एफ आय आर नुसार त्वरित कारवाई करण्याचे आदेश देऊन सुद्धा आज १७ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना आपली जनावरे मिळालेली नाही.
पोलीस आरसी बाफना यांच्यावर कारवाई का करत नाही? शेतकऱ्यांचा प्रश्न.
शेतकऱ्यांनी आरसी बाफना विरोधात भादवि ४२०,४०६,४०८ सह ३४प्रमाणे एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिनांक १४ ऑगस्ट रोजी तक्रार देऊन सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून आज १७ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक जळगाव यांना सदर तक्रार करण्यात आली असून आर सि बाफना व त्यांच्या सर्व संचालकांवर त्वरित गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे.
ना. देशमुख गृहमंत्री यांना सुद्धा अल्पसंख्याक अध्यक्षद्वारे तक्रार
जळगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक अध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांची भेट घेऊन या राज्यात अल्पसंख्यांक शेतकऱ्यांची बाजू घेणारे कोणी नाही का? आर सी बाफना हे श्रीमंत असल्याने त्यांच्यावर गुन्हा का दाखल करता येत नाही का?पोलिसांचे आदेश न मानल्यास इतरांवर कसा गुन्हा दाखल होतो? असे अनेक प्रश्न विचारून त्यांनी महाराष्ट्र शासनावर सुद्धा अविश्वास व्यक्त केला म्हणून गफ्फार मलिक यांनी सदर प्रकरणी त्वरित गृहमंत्री ना अनिल देशमुख यांना त्वरित ई-मेल द्वारे शेतकरांचा प्रश्न व बाफना गो शाळे चे संचालकांचे गैर कायदेशीर कृत्य हे इमेल द्वारे कळवून कारवाईची मागणी केली आहे.
तीन दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन करणार
आरसी बाफना गोशाळा व त्यांचे संचालक मंडळ हे जाहीररीत्या पोलिसांचे आदेशाची पायमल्ली करून कायदा पायदळी तुडवत आहे, जिल्हा दंड अधिकाऱ्याचे आदेशाची सुद्धा अवेहलना होत असल्याने पोलिसानी त्यांच्यावर तीन दिवसा च्या आत शेतकऱ्यांचे जनावरे परत न मिळाल्यास व त्यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास जळगाव शहरातील सर्व शेतकरी व समाजातील नागरिक त्रिव स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचे ते आठ शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते माजी नगर सेवक इकबाल पिरजादे, शिव सेना नगर सेवक इब्राहिम पटेल, झाकीर पठाण, एमआयएमचे नगर सेवक रियाझ बागवान, हाजी युसूफ,अक्रम देशमुख, एम आय एम जिल्हा अध्यक्ष जीया बागवान, काँग्रेस आईचे जमील शेख, समाजवादी चे रईस बागवान, राष्ट्रवादीचे सलीम इनामदार, कुल जमातीचे बशीर बुऱ्हानी, जमियत उलमा चे हाफिज शफी , मानियार बिरदारीचे बिरादरीचे फारुक शेख, वहिदत ए इस्लामी चे अतिक शेख,ईदगाह ट्रस्ट चे अनिस शाह, अक्सा बाईज चे आमिर शेख व अर्षद खान, सिकलगर बिरदारीचे अन्वर खान व अझीझ सिकलगर, खाटीक बिरदारीचे डॉ रिझवान खाटीक,मौलाना आझाद मेहरून चे अख्तर शेख, कोहेतूर मल्टि परपस चे कासीम उमर, अमन फाउंडेशन चे अश्फाक शेख व रेहान खाटीक, लकी फौंडेशन चे सईद फयाझ, आदींनी कळवलेले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here